कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जो रुट,स्टार्कने गाजवला पहिला दिवस

06:05 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, ‘पिंकबॉल’ कसोटी : रुटचे नाबाद शतक, क्रॉलीचीही अर्धशतकी खेळी : स्टार्कचा ‘षटकार’

Advertisement

वृत्तसंस्था/ब्रिस्बेन

Advertisement

गॅबा स्टेडियमवर सुरु झालेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क आणि इंग्लंडसाठी जो रुटने गाजवला. स्टार्कने 6 विकेट्ससह इतिहास घडवला, तर रुटने शतकी खेळी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रुटच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 9 बाद 325 धावा केल्या होत्या. रुट 135 तर जोफ्रा आर्चर 32 धावांवर खेळत होते.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाला सुरुवात केल्यानंतर मिचेल स्टार्कने पहिल्या षटकात बेन डकेटला भोपळाही फोडू दिला नाही तर तिसऱ्या षटकात ऑली पोपला त्यानेच शून्यावर बाद केले. यामुळे इंग्लंडने 5 धावांवरच 2 विकेट्स गमावल्या. पण नंतर झॅक क्रॉली आणि जो रुट यांनी डाव सावरला. त्यांनी 117 धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला.

क्रॉली शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच त्याला 28 व्या षटकात मायकल नासिरने अॅलेक्स कॅरेच्या हातून झेलबाद केले. त्याने 93 चेंडूत 11 चौकारासह 76 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतरही रुटला हॅरी ब्रूकने साथ दिली. ही जोडी जमलेली असतानाच ब्रूकचा अडथळा स्टार्कनेच दूर केला. मिचेल स्टार्कने 40 व्या षटकात स्टीव्ह स्मिथच्या हातून 31 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स 19 धावा करुन माघारी परतला. जेमी स्मिथलाही भोपळा फोडता आला नाही. विल जॅक्स रुटची साथ देत होता, पण तोही फार काळ मैदानावर टिकला नाही. जॅक्सला स्टार्कनेच 19 धावांवर माघारी धाडले.

जो रुटचे नाबाद शतक

दरम्यान, अनुभवी रुटने ऑस्ट्रेलियन भूमीत आपले पहिले शतक पूर्ण केले. रुटचे हे कसोटी क्रिकेटमधील 40 वे शतक ठरले. यापूर्वी तो 15 कसोटी ऑस्ट्रेलियात खेळला होता, पण त्याला एकही शतक करता आले नव्हते. रुटने जरी शतक केले असले तरी दुसऱ्या बाजूने कोणाची साथ मिळाली नाही. गस अॅटकिन्सन (4) आणि ब्रायडन कार्स (0) हे फलंदाजही स्वस्तात बाद झाले. यामुळे इंग्लंडची 9 बाद 264 अशी स्थिती झाली होती.

पण यानंतर जो रुट आणि जोफ्रा आर्चर या दोघांनी तुफानी फटकेबाजी करत 5 ओव्हरमध्ये 52  धावा केल्या. जोफ्रा आर्चरने दोन षटकारांसह 26 बॉलमध्ये 32 धावा फटकावल्या. जो रुटसह मिळून त्याने 10 व्या विकेटसाठी अभेद्य 61 धावांची भागीदारी केली आहे. यामुळे इंग्लंडला पहिल्या दिवस अखेर 74 षटकात 9 बाद 325 धावांपर्यंत पोहोचता आले. पहिला दिवस संपला, तेव्हा जो रुट 135 धावांवर तर जोफ्रा आर्चर 32 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 71 धावांत 6 गडी बाद केले.

मिचेल स्टार्कचा आणखी एक विक्रम

इंग्लंडविरुद्ध पहिल्या अॅशेस कसोटीत डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 3 बळी घेत एकूण 10 बळी घेण्याची किमया केली. यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने 6 बळी घेण्याचा कारनामा केला आहे. या कामगिरीसह स्टार्कने सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांच्या विक्रमाच्या यादीत वसीम अक्रमला मागे टाकले आहे. आता, तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे.

जो रुटचे ऑस्ट्रेलियन भूमीत पहिलेवहिले शतक

इंग्लंडचा संघ जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा अनुभवी फलंदाज जो रूट खंबीरपणे उभा राहतो. अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी दरम्यान रुटने 135 धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीसह त्याने एक ऐतिहासिक कारनामा देखील केला. रुटचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 40 वे शतक आहे. पण विशेष म्हणजे, त्याला ऑस्ट्रेलियात खेळताना एकही शतकी खेळी करता आली नव्हती. पण, कसोटी खेळायला सुरुवात केल्यापासून तब्बल 13 वर्षानंतर त्याने ऑस्ट्रेलियन भूमीत शतक झळकावले आहे.

कुमार संगकाराला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीसह जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ही कामगिरी करताना त्याने श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकले. दरम्यान, आणखी 1 शतक झळकावताच रुटकडे रिकी पाँटींगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

कसोटीत सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

कसोटीमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे डावखुरे वेगवान गोलंदाज

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 74 षटकात 9 बाद 325 (झॅक क्रॉली 76, बेन डकेट 0, ओली पोप 0, जो रुट नाबाद 135, हॅरी ब्रूक 31, बेन स्टोक्स 19, जेमी स्मिथ 0, विल जॅक्स 19, आर्चर खेळत आहे 32, स्टार्क 71 धावांत 6 बळी, बोलँड आणि नासीर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article