महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जो बिडेन यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह

06:43 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवसात केवळ 6 तास काम करण्याची क्षमता

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेत यंदा होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बिडेन आणि रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आमने-सामने असणार आहेत. परंतु त्यापूर्वीच समोर आलेल्या आय एक्सियोसच्या अहवालामुळे बिडेन यांच्या आरोग्याच्या स्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहवालानुसार बिडेन हे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच काम करू शकतात.

व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांचा दाखला देत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बिडेन  प्रतिदिन केवळ 6 तासच चांगल्याप्रकारे काम करू शकतात. तरीही तेथे कमजोर आणि थकलेले वाटतात. विदेश दौऱ्यादरम्यान देखील त्यांची प्रकृती आश्वासक वाटत नाही. व्हाइट हाउसचे अधिकारी बिडेन यांची बैठक निश्चित वेळेत पूर्ण व्हावी याची काळजी घेत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

श्वसनावेळी समस्या

एक्सियोसच्या अहवालामुळे बिडेन यांची तंदुरुस्ती आणि आरोग्यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बिडेन हे पूर्वीपासून स्लीप एप्निया यासारख्या आजाराला तोंड देत आहेत. या आजारामुळे झोपेत श्वसन करण्यास समस्या जाणवत असते. या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आणि रात्री चांगल्या झोपेसाठी ते कंटीन्यूअस पॉझिटिव्ह एअर-वे प्रेशरचा वापर करतात. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीत पार पडलेल्या जी-20 परिषदेदरम्यान बिडेन कंटीन्यूअस पॉझिटिव्ह एअर-वे प्रेशर मशीन सोबत घेऊन आले होते.

अडखळत असल्याची प्रतिमा

28 जून रोजी बिडेन यांनी प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये भाग घेतला होता. या चर्चेदरम्यान बिडेन हे अनेकदा विचार न करता बोलताना दिसून आले होते. तसेच ते अनेकदा अडखळले हेते, यामुळे ते चर्चेत ट्रम्प यांच्याकडून पराभूत झाले हेते.  ही चर्चा सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान न झाल्याने बिडेन यात पराभूत झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे प्रचारात बिडेन यांच्या खराब आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. बिडेन आता वृद्ध झाले असल्याचे ट्रम्प म्हणत आहेत. परंतु ट्रम्प हे बिडेन यांच्यापेक्षा केवळ तीन वर्षांनी लहान आहेत.

डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात डेमोक्रेट्स

प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये बिडेन यांची सुस्त भूमिका आणि पोल्समध्ये ट्रम्प यांची आघाडी पाहता डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आता डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहेत. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी बिडेन यांच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. आम्ही जे प्राप्त करू इच्छित होते, ते आम्ही केले, आमचे अध्यक्ष निवडणूक जिंकणार आहेत असे हॅरिस यांनी म्हटले आहे.

प्रकृती बरी नव्हती

चर्चेवेळी माझी प्रकृती बरी नव्हती. तरीही मी चांगली कामगिरी केल्याचे वाटते. अखेर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीसोबत वाद घालणे अवघड असल्याचा युक्तिवाद बिडेन यांनी केला आहे. एकीकडे चर्चेतील स्वत:च्या कामगिरीसाठी बिडेन यांच्यावर टीका होतेय, तर दुसरीकडे ट्रम्प यांचे कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article