महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संशोधनातून रोजगार निर्मिती

11:47 AM Nov 28, 2024 IST | Radhika Patil
Job creation through research
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे : 

Advertisement

नवीन शैक्षणिक धोरणानुसार नोकऱ्यांऐवजी संशोधनाच्या माध्यमातून नवसंकल्पनावर आधारावर स्टार्टअप सुरू करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने शाळा-महाविद्यालयांना दिल्या आहेत. परिणामी विद्यापीठासह बहुतांश महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्राची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून नवसंकल्पनावर आधारीत संशोधनाचे प्रस्ताव मागवले जातात. त्यातील अतिउत्तम प्रस्तावांची निवड करत संबंधित संशोधकांना व्यवसायासाठी स्टार्टअप डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी)कडून कमीत-कमी तीन लाख आणि जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे अलीकडे नवसंशोधनातून रोजगार निर्मिती करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.

Advertisement

राज्य शासनाकडून स्टार्टअप केंद्राला दोन ते पाच कोटीपर्यंतचे अनुदान दिले जाते. या केंद्रांतर्गत नवनवीन संशोधनावर आधारीत व्यवसाय निर्मितीला प्राधान्य दिले जाते. परिणामी अनेक संशोधक या स्टार्टअप केंद्राच्या माध्यमातून पुढे येत आहेत. त्यांना अनुदानाच्या स्वरूपात शासनही मदत करीत असल्याने व्यवसाय सुरू करता येतो. विद्यापीठ अंतर्गत स्टार्टअपच्या माध्यमातून शेतीविषयक अवजारे, आयुर्वेदिक औषध अशा प्रकल्पांना मिळालेल्या अनुदानातून संशोधकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. केआयटी, डीवायपाटील विद्यापीठ, विवेकानंद कॉलेजमधील स्टार्टअप केंद्रांतर्गतही पाच नवसंशोधकांनाही अनुदान मंजूर झाले. यातून त्यांनी आपले संशोधन समाजोपयोगी केले. विद्यापीठातील प्रदर्शनात गुळ, गुळाची पावडर, काकवी, गुळ-शेंगदाणे, ड्रायफुडपासून पौष्टिक चक्की, गुळपोळी, गुळआंबा यासह अन्य पदार्थ पुढे आले.

एका प्रोजेक्टमध्ये अनेकांना मिळतो रोजगार

एका संशोधकाने प्रोजेक्ट सुरू केला तर किमान दोन लोकांना रोजगार मिळत असल्याने तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवसंकल्पनांचा प्रस्ताव देण्यासाठी शिक्षणाची अट नसल्याने अशिक्षित व्यक्तीही प्रस्ताव पाठवू शकतात. शिक्षणाची अट नसल्याने किमान शिक्षण घेतलेल्या अनेकांनी आपल्या नवसंकल्पनांचा प्रोजेक्ट मंजूरीसाठी पाठवला आहे. शिवाजी विद्यापीठातील स्टार्टअप शासनाचे असल्याने येथील प्रस्तावाला शासनाकडून त्वरित अनुदान दिले जाते.

केआयटीमधील दहाजणांना अनुदान

केआयटी कॉलेजमध्ये स्टार्टअपसाठी 17 प्रस्ताव आले होते. त्यापैकी 10 प्रस्तावांना 50 लाखाचे अनुदान दिले. तर इतर प्रस्तावांना बँक, मिनिस्ट्रीने सीएसआर फंडातून प्रोजेक्टसाठी भरीव अनुदान दिले. परिणामी संबंधितांनी आपला व्यवसाय सुरू करत दुसऱ्यांनाही रोजगार दिला.

शिवाजी विद्यापीठालील स्टार्टअप

प्री-इन्क्युबेटी विद्यापीठात जॉईन होऊन त्यांच्या नवसंकल्पनावर आधारित काम करीत आहेत. तसेच स्टार्टअप डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) मिनिस्ट्री कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री हा नंबर अनेकांना मिळाला असून ते स्टार्टअप झाले आहेत. त्यांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करून प्रस्ताव केला आहे. विद्यापीठात जागा व इतर सुविधा, लॅब, मार्गदर्शन दिले आहे. त्याचबरोबर सारथीने चार लोकांना 25 हजार फेलोशिप दिली आहे. त्यांच्या आयडीयांना मायस्क्रो स्मॉल मिडियम इंटरप्राइजकडून 14 लाख मिळाले. तर टेक पीएमजी एसपीआयटी संस्थेकडून 25 लाख मंजूर तर आयआयबेंगलोरकडून 7 लाख मिळाले. काही प्रस्तावांना नाबार्डचे पैसे मिळणार आहेत.

14 जणांनी केले व्यवसाय सुरू

शिवाजी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील 14 संशोधकांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले. त्यांच्या व्यवसायाच्या रूपाने अनेकांना नोकरीची संधी मिळाली आहे. त्यामुळे संशोधनातून नवसंकल्पनांना मूर्त रूप देऊन रोजगार निर्मिती करता येते, हे सिध्द होत आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article