For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो एडेलची रिच पॉलसोबत एंगेजमेंट

06:42 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
जो एडेलची रिच पॉलसोबत एंगेजमेंट
Advertisement

चाहत्यांना दिला सुखद धक्का

Advertisement

ब्रिटिश गायिका-गीतकार आणि संगीतकार एडेल लॉरी ब्ल्यू एडकिन्स ही जो एडेल नावाने प्रसिद्ध आहे. तिने पुन्हा एकदा स्वत:च्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गायिकेने अमेरिकन स्पोर्ट्स एजेंट आणि क्लच स्पोर्ट्स ग्रूपचे संस्थापक रिच पॉलसोबत एंगेजमेंट केली आहे. याची माहिती तिनेच दिली आहे.

एडेल आणि रिच पॉल हे जुलै 2021 मध्ये डेटिंग करत असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली होती. एनबीए फायनल गेममध्ये त्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले होते. या जोडप्याने त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात स्वत:च्या रिलेशनशिपची पुष्टी दिली होती.

Advertisement

ओफ्रा विन्फ्रेसोबतच्या एका मुलाखतीदरम्यान एडेलने रिच पॉलसोबतच्या स्वत:च्या पहिल्या भेटीविषयी सांगितले होते. आता हे जोडपे विवाहबद्ध होणार आहे. एडेलचा पहिला विवाह सायमन कोनेकीसोबत झाला होता. दोघांचाही 2019 मध्ये घटस्फोट झाला होता. या पूर्वाश्रमीच्या जोडप्याला 11 वर्षांचा एक मुलगा असून त्याचे नाव एंजेलो आहे.

Advertisement
Tags :

.