कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जेएनयूमध्ये ‘कुलपतीं’ना आता ‘कुलगुरू’ संबोधणार

07:00 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (जेएनयू) आता त्यांच्या कागदपत्रांमध्ये आणि पत्रव्यवहारात ‘कुलपती’ ऐवजी ‘कुलगुरू’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ भाषिक बदल म्हणून नव्हे तर भारतीय ज्ञान परंपरा, समावेशकता आणि लिंग तटस्थतेसाठी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून घेण्यात आला आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री धुलिपुडी पंडित यांनी अलिकडच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांवर आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांवर ‘कुलगुरू’ हा शब्द वापरण्याचा प्रस्ताव मांडला होता. संस्कृतमध्ये ‘कुलगुरू’ हा शब्द अधिक अचूक, अर्थपूर्ण आणि लिंग तटस्थ असल्याचे त्यांचे मत आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून विचाराधीन होता. त्यानंतर आता कुलगुरूंनी स्वत: तो प्रस्तावित करत अंतिम निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article