महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सफाई कर्मचाऱ्यांसोबत जितो लेडिज विंगची दिवाळी

10:29 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दिव्यांचा सण दिवाळी सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशा उत्सवी वातावरणात जितो लेडिज विंगच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. नुकतीच बेळगाव शहरातील सदाशिवनगर येथील आंबेडकर भवन येथे जितो लेडिज विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. समाजबांधव आणि नि:स्वार्थ भावनेने दररोज शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी सुनील टेक्स्टाईलतर्फे 50 महिला कर्मचाऱ्यांना नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले. जितो लेडिज विंगच्या पदाधिकारी पूनम लेंगडे यांच्या हस्ते सौंदर्यप्रसाधनांचे वाटपही करण्यात आले. यावेळी समन्वयक सुनीता कटारिया, सहसंयोजक कीर्ती दो•ण्णवर, जितो लेडिज विंगच्या अध्यक्षा माया जैन, सरचिटणीस ममता जैन आदी उपस्थित होत्या.

Advertisement

खाद्यपदार्थ-फराळाचे वाटप

Advertisement

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो संस्थेच्यावतीने दिवाळीनिमित्त आर्थिकदृष्ट्या 50 मागास कुटुंबांना खाद्यपदार्थ व मिठाईचे वाटप करण्यात आले. बेळगाव शहरातील अनगोळ, अलारवाड, हलगा, बस्तवाड, मजगाव, जुने बेळगाव, मच्छे, पिरनवाडी, शहापूर या भागातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना एक महिन्याचे खाद्यपदार्थ व मिठाई देण्यात आली. यावेळी जितोचे अध्यक्ष वीरधवल उपाध्ये, सरचिटणीस अशोक कटारिया, कार्यक्रम समन्वयक सुनीला बस्तवाड, युवा संघाचे अध्यक्ष दीपक सुभेदार, वैभव मेहता, प्राणनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article