For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओ महिन्याला 10 लाख घरांमध्ये ब्रॉडबँडची करणार स्थापना

06:49 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिओ महिन्याला 10 लाख घरांमध्ये ब्रॉडबँडची करणार स्थापना
Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांची घोषणा

Advertisement

नवी दिल्ली :

रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा अलीकडेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ते म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी बोनस शेअर्सचा विचार केला जाईल. तर दर महिन्याला 1 दशलक्ष घरांना ब्रॉडबँडने जोडण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.

Advertisement

पहिले 1 दशलक्ष वापरकर्ते 6 महिन्यात

मुकेश अंबानी म्हणाले की, विक्रमी वेळेत 100 दशलक्ष होम ब्रॉडबँड ग्राहक मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 1 दशलक्ष घरांना ब्रॉडबँडने जोडण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. आरआयएलच्या 47 व्या वार्षिक सभेत बोलताना नुकतीच त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच जिओएअरफायबरने सहा महिन्यात 10 लाख ग्राहक मिळवले असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले अध्यक्ष

आमच्या सखोल तंत्रज्ञान क्षमतेचा फायदा घेऊन आणि प्रत्येक प्रक्रियेला सतत अनुकूल करून, आम्ही पुढील 1 दशलक्ष एअर फायबर ग्राहक केवळ 100 दिवसांत गाठले. आता आम्ही या गतीने दर 30 दिवसांनी 10 लाख घरे जोडण्याचे आव्हान स्वीकारत आहोत, विक्रमी वेगाने 100 दशलक्ष होम ब्रॉडबँड ग्राहकांचे लक्ष्य गाठण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

नीता अंबानी काय म्हणाल्या....

दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनीही आपल्या भाषणात, क्रीडा, शिक्षण आणि सांस्कृतिक जतन यासह अनेक समस्यांच्या उपायासाठी आणि एकंदर विकासासाठी फाउंडेशनच्या चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विकास, नवकल्पना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशातील कोट्यावधी लोकांचे जीवन उंचावण्यासाठी आम्ही सज्ज्ज असतो, असेही त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.