भारताचा विकास दर 7.5 टक्के राहणार
10:00 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : भारताचा विकास दर हा 7.5 टक्के इतका राहू शकणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वर्तवला आहे. भारतात सदरचा विकास दर साध्य करण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 7.2 टक्के इतका अंदाज यापूर्वी रिझर्व्ह बँकेने वर्तवला असला तरी त्यापेक्षा किंचीत जास्त विकास दर असू शकतो, असेही दास यांनी म्हटले आहे. सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय मंचावर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले या वर्षाअखेर विकास दर 7.2 टक्के इतका राहू शकतो. एप्रिल-जून तिमाहीत मात्र भारताचा विकास 6.7 टक्के इतका कमी राहिला होता. सरकारच्या खर्चात झालेल्या कपातीमुळे दर घसरला होता. चालू आर्थिक वर्षात महागाई दर घसरुन 4.5 टक्क्यांवर राहू शकतो असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.
Advertisement
Advertisement