जिओ ब्रँड देशात अव्वल स्थानी
ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंतर्गत असलेली जिओ या कंपनीने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दिग्गज विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मागे टाकत देशातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून आपले स्थान भक्कम केलेले आहे.
ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालात अशी माहिती समोर आली आहे की 2024 च्या पहिल्या महिन्यातच जिओ सर्वात मजबूत भारतीय ब्रँड म्हणून उदयास आला आहे. या अहवालात, गेल्या वर्षी म्हणजेच 2023 च्या क्रमवारीत जिओ हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड होता.
जिओ जगातील सर्वात मजबूत ब्रँडमध्ये सामील झाला आहे. गुगल, युट्यूब, वूईचॅट, कोकाकोला, डिलायट आणि नेटफ्लिक्स जगातील सर्वात मजबूत ब्रँड नावांच्या यादीत जिओने 88.9 गुण मिळवले. यानंतर जिओ जगातील मोठ्या ब्रँडमध्ये 17 व्या स्थानावर पोहोचला आहे.
‘ग्लोबल-500 2024’ च्या अहवालात जिओ 23 व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांपूर्वी एलआयसीने मार्केट कॅपच्या बाबतीत एसबीआयला मागे टाकले होते. एलआयसी आणि एसबीआय या दोन्ही भारतीय ब्रँडने इंस्टाग्रामला मागे टाकले आहे. एसबीआय जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर आहे.