.‘जिओ ब्लॅकरॉकर’चा लवकरच म्युच्युअल फंडमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/मुंबई
रिलायन्सचा वित्तीय सेवा व्यवसाय जुलै 2023 मध्ये त्याच्या मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून वेगळा करण्यात आला. जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाला भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून मान्यता मिळाली आहे. जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक यांच्यातील 50:50 संयुक्त उपक्रम आहे. सेबीने मंगळवारी भारतात त्याच्या म्युच्युअल फंड व्यवसायासाठी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी जिओ ब्लॅकरॉकला मान्यता दिली.
दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात काय म्हटले?
दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘जियो ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट भारतातील वाढत्या संख्येतील भारतीय रिटेल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी एक नाविन्यपूर्ण गुंतवणूक प्रस्ताव आणेल. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी तिच्या दोन प्रायोजकांच्या अद्वितीय ताकदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. जियो ब्लॅकरॉकने सिडला त्यांचे सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. यासह, जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने सिड स्वामीनाथन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. सिड स्वामीनाथन यांना मालमत्ता व्यवस्थापनात 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. याआधी, सिड ब्लॅकरॉक येथे आंतरराष्ट्रीय निर्देशांक इक्विटीचे प्रमुख होते, जिथे ते 1.25 ट्रिलियन एयूएमसाठी जबाबदार होते. सिड यांनी ब्लॅकरॉक येथे युरोपसाठी स्थिर उत्पन्न पोर्टफोलिओ व्यवस्थापक प्रमुख म्हणूनही काम केले, जिथे ते पद्धतशीर आणि अनुक्रमित धोरणांसाठी जबाबदार होते.