महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीनजीन, बेन्सिक, बेडोसा, नदाल तिसऱया फेरीत

06:00 AM May 27, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पेंच ग्रँडस्लॅम टेनिस : जोकोविच, व्हेरेव्ह, अल्कारेझ, मेदवेदेव्ह यांची आगेकूच, प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

Advertisement

प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेझ, अलेक्झांडर व्हेरेव्ह, नोव्हॅक जोकोविच, डॅनील मेदवेदेव्ह, राफेल नदाल यांनी तर महिलांमध्ये बेलिंडा बेन्सिक, लैला फर्नांडेझ, लिओलिया जीनजीन, कोको गॉफ, पॉला बेडोसा यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली. कॅरोलिना प्लिस्कोव्हा, कॅटरिना सिनियाकोव्हा, बियान्का अँड्रेस्क्यू यांचे आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले.

तिसऱया मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने दोन सेट्ची पिछाडी भरून काढत अर्जेन्टिनाच्या सेबॅस्टियन बाएझवर 2-6, 4-6, 6-1, 6-2, 7-5 अशी मात करीत तिसरी फेरी गाठली. तीन तास 36 मिनिटे ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमाशी होईल. नाकाशिमाने दुसऱया फेरीत टॅलन ग्रीकस्पूरचा पराभव केला. 19 वर्षीय स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला येथे सहावे मानांकन मिळाले असून त्याने चौथ्या सेटमध्ये एक मॅचपॉईंट वाचवला तर पाचव्या सेटमध्ये 0-3 अशा पिछाडीवरून सेटसह त्याने त्याचाच देशवासी अल्बर्ट रॅमोस व्हिनोलासवर 6-1, 6-7 (7-9), 5-7, 7-6 (7-2), 6-4 असा विजय मिळविला. अग्रमानांकित जोकोविचने स्लोव्हाकियाच्या ऍलेक्स मॉल्कनचा 6-2, 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करीत आगेकूच केली. सव्वादोन तास ही लढत चालली होती. त्याची लढत स्लोव्हेनियाच्या बेडेनेविरुद्ध होईल.

नदालचा 300 वा ग्रँडस्लॅम विजय

अन्य सामन्यात राफेल नदालने शानदार प्रदर्शन करीत ग्रँडस्लॅममधील 300 वा विजय नोंदवताना फ्रान्सच्या कोरेन्टिन मुटेटचा 6-3, 6-1, 6-4 असा धुव्वा उडविला. ग्रँडस्लॅममध्ये 300 विजयाचा टप्पा गाठणारा नदाल हा तिसरा खेळाडू आहे. याआधी फेडररने 369 तर जोकोविचने 324 विजय नोंदवले आहेत. रशियाच्या मेदवेदेव्हने तिसरी गाठताना सर्बियाच्या लॅजलो डेअरचा 6-3, 6-4, 6-3 असा पराभव केला.

महिला एकेरीत स्वित्झर्लंडच्या ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या बेलिंडा बेन्सिकने कॅनडाच्या बियान्का अँड्रीस्क्यूचे आव्हान 6-2, 6-4 असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. कॅनडाच्या लैला फर्नांडेझविरुद्ध तिचा पुढील सामना होईल. फर्नांडेझने झेकच्या सिनियाकोव्हाला 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. सिनियाकोव्हा ही दुहेरीतील अव्वल मानांकित खेळाडू आहे. 18 वर्षीय कोको गॉफने तिसरी फेरी गाठताना ऍलिसन व्हान उत्वान्कचा 6-1, 7-6 (7-4) असा पराभव केला. अन्य सामन्यात फ्रान्सच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या लिओलिया जीनजीनने धक्कादायक निकाल नोंदवताना माजी अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा 6-2, 6-2 असा धुव्वा उडवला. प्लिस्कोव्हाला येथे आठवे मानांकन देण्यात आले होते. 26 वर्षीय जीनजीनला फ्रान्सची भावी स्टार म्हणून ओळखले जात असे. पण 15 व्या वर्षी अपघात झाल्यानंतर तिला टेनिसपासून दोन वर्षे दूर रहावे लागले. निकेने त्यावेळी तिच्याशी केलेला दहा वर्षांचा करारही रद्द केला होता. 12 वर्षापासून पेंच फेडरेशनने तिच्यासाठी प्रशिक्षक नियुक्त केला होता. फेडरेशनने तो करारही रद्द केल्यानंतर ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. तिची पुढील लढत रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगूशी होईल. तिसऱया मानांकित पॉला बेडोसाने स्लोव्हेनियाच्या काया जुव्हानवर 7-5, 3-6, 6-2 अशी मात करीत आगेकूच केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article