जिंदालचा ओडिशात कारखाना
वृत्तसंस्था/ कटक
जिंदाल(इंडिया) लिमिटेडचा पोलाद उत्पादनासाठीचा कारखाना ओडिशात होणार असून त्याकरीता राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या कारखान्यासाठी कंपनी 3600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
आगामी 2030 पर्यंत ओडिशात तीन टप्प्यात प्रकल्पाकरीता 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही सांगितले जात आहे. पोलाद उत्पादन कारखाना हा ग्रीनफिल्ड अर्थात हरितअंतर्गत तयार केला जाणार आहे. या कारखान्यात कंपनी स्पेशल कोटेड स्टील उत्पादनांची निर्मिती करणार आहे. या कारखान्यातून 9.6 लाख दशलक्ष टन इतके उत्पादन वार्षिक स्तरावर घेतले जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
30 लाख दशलक्ष टनचे उद्दिष्ट
जिंदाल स्टील टेक लिमिटेडच्या सहकारी कंपनीने सांगितले की ओडिशातील सदरच्या पोलाद कारखान्यातील उत्पादन क्षमता 2030 पर्यंत 30 लाख दशलक्ष टन इतके वार्षिक करण्याचे ध्येय आहे.