For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘विजापूर’मधून जिगजिनगी यांचा चौकार

10:33 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘विजापूर’मधून जिगजिनगी यांचा चौकार
Advertisement

वार्ताहर /विजापूर

Advertisement

विजापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रमेश जिगजिनगी यांनी चौथ्यांदा विजय मिळविला. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. राजू अलगूर यांचा पराभव करत 77,229 मतांच्या फरकाने पराभूत करून विजय मिळवला. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. रमेश जिगजिनगी यांना 6,72,781 तर काँग्रेसचे प्रा. राजू अलगूर यांना 59,552 मते मिळाली. एकूण 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली आणि प्रत्येक फेरीत जिगजिनगी आघाडीवर राहिले. त्यांचे विरोधक प्रा. राजू अलगूर यांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाही. पोस्टल व्होटमध्येही भाजपचे उमेदवार रमेश जिगजिनगी यांना सर्वाधिक 3726 मते मिळाली. प्रा. राजू अलगूर यांना 2275 मते मिळाली. विजापूर मतदारसंघात 66.32 टक्के मतदान झाले होते. राखीव लोकसभा मतदारसंघात एकूण 1946090 मतदार असून त्यापैकी 1290580 मतदारांनी मतदान केले होते. एकूण 987974 पुरुष मतदारांपैकी 664729 पुरुष मतदारांनी मतदान केले. 957906 महिला मतदारांपैकी 625797 महिला मतदारांनी मतदान केले.  मतदारांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आहे. त्यांची सेवा करून हे ऋण मी फेडणार आहे. माझ्या विजयासाठी माझे कार्यकर्ते बांधव, नेते व चाहत्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या प्रेमाबद्दल, कौतुकाबद्दल आणि मेहनतीबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. या निमित्ताने पुन्हा एकदा विजापूर शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे विजयी उमेदवार रमेश जिगजिनगी यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.