झुंझार क्लब, खंडोबा तालीमचा शानदार विजय
कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए (लीग) वरिष्ट गट फुटबॉल स्पर्धेअंतर्गत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात झुंजार क्लबने वेताळमाळ तालीम मंडळावर 2-1 गोलफरकाने विजय मिळवत तीन गुण प्राप्त केले. तसेच दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस्ला 4-0 गोलने सहज पराभूत केले. या सामन्यात खंडोबाला विजय करण्यासाठी सुभा घोषने (पश्चिम बंगाल) हॅटट्रिकसह चार गोल नोंदवण्याची कामगिरी केली.
झुंजार क्लब व वेताळमाळ तालीम मंडळ या संघात दुपारी दीड वाजता पहिला सामना झाला. सामन्याच्या पुर्वार्धात गोल कऊन आघाडी घेण्यात दोन्हीही संघ अपयशी ठरले. उत्तरार्धात मात्र 60 व्या मिनिटाला झुंझारच्या स्वप्निल तेलवेकरने वेताळमाळवर पहिला गोल केला. यानंतर आक्रमक झालेल्या वेताळमाळने झुंझारवर चालींचा मारा केला. 69 व्या मिनिटाला केलेल्या एका चालीमध्ये झुंझारच्या बचावफळीतील खेळाडूने वेताळमाळच्या सर्वेश वाडकरला धोकादायकरित्या पाडले. त्यामुळे मुख्यपंच सुमित जाधव यांनी वेताळमाळला पेनल्टी दिली. या पेनल्टीमधील संदीप पोवारने झुंझारच्या गोलजाळ्यात चेंडू मारत सामना 1-1 गोलबरोबरीत आणला. 74 व्या मिनिटाला झुंझारने केलेली चाल वेताळमाळच्या बचावफळीला रोखता आली नाही. या चालीतून संचित साळोखेने वेताळमाळवर गोल करत सामन्यात झुंझारला 2-1 गोलफरकाची बढत मिळवून दिली. सामना संपेपर्यंत हीच बढत कायम राहिली आणि झुंजारचा वेताळमाळवर विजय झाला.
‘खंडोबा’चा सहज विजय
खंडोबा तालीम व सम्राटनगर स्पोर्टस् यांच्यात दुसरा सामना झाला. या सामन्यात 7 व्या मिनिटाला खंडोबाच्या सुभा घोषने सम्राटनगरवर पहिला गोल करत आपले व संघाचे गोलचे जणू खातेच खोलले. 29 आणि 31 व्या मिनिटाही सुभानेच सम्राटनगरवर दुसरा व तिसरा गोल करत आपली हॅटट्रीकही साधली. पुर्वार्ध संपेपर्यंत सम्राटनगरने आपल्यावरील गोलची परतफेड करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांमधून खंडोबाच्या बचावफळीने सम्राटनगरच्या खेळाडूंना गोल करण्याची संधीच दिली नाही. उत्तरार्ध सुऊ झाल्यानंतर 44 व्या मिनिटाला सुभाने सम्राटनगरवर चौथा गोल कऊन खंडोबाला भक्कमस्थिती नेले. उर्वरीत 36 मिनिटांच्या वेळेत सम्राटनगरकडून आपल्यावरील चारही गोलचीपरतफेड करण्यासाठी टोकाचे प्रयत्नच झाले नाहीत. परिणामी या संघाला खंडोबाकडून 4 गोलने पराभव स्वीकारावा लागला.
हर्षल, समर्थ व चंदनला रेडकार्ड
पहिल्या सामन्यात चेंडूवर ताबा घेण्यासाठी झुंजार क्लबच्या समर्थ नवले व वेताळमाळ तालीम मंडळाच्या चंदन गवळीने आक्रमक पवित्रा घेत एकमेकांना जोरात रेटण्याचा प्रयत्न केला. यातून चेंडूवरील ताबा निसटल्यानंतर समर्थ व चंदन या दोघांनी बाचाबाची करत एकमेकांना धक्काबुक्की करत आपल्यातील अखिलाळाडूवृत्ती दाखवून दिली. या प्रकाराची मुख्यपंच सुमित जाधव यांनी गंभीरपणे दखल घेत समर्थ व चंदनला थेट रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. तसेच झुंजार क्लबच्या हर्षल चौगुले यालाही अखिलाडूवृत्तीने खेळ केल्याबद्दल पंच सुमित जाधव यांनी डबल एलो टू रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर केले.