महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तासगांव रथोत्सवात एक लाखांचे दागिने लंपास.! अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल.

03:40 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
Rathotsavam of Tasgaon
Advertisement

तासगाव प्रतिनिधी

तासगांवात रथोत्सवावेळी तासगांवातीलच दोन महिलांच्या गळयातील 1 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मंजुळा सचिन राठोड,रा.सिध्देश्वर कॉलनी तासगांव,मुळ रा.हडगल्ली लमाणतांडा ता.जि.विजापूर यांनी अज्ञात चोरट्या विरूध्द फिर्याद दिली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की,रविवारी तासगांवातील प्रसिध्द रथोत्सव होता.त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या महिला कल्पना कांतीलाल माळी रा.विसापुरे मळा,पुणदी रोड,तासगांव या रथ उत्सव दर्शन करीता आल्या होत्या. दुपारी 1 च्या दरम्यान फिर्यादी या गणपती मंदिर रथाजवळ दर्शन घेत असताना त्यांच्या गळयातील 20 हजार रूपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्या हिसडा मारून चोरून नेले.

Advertisement

कल्पना माळी या गणपती मंदिर समोर असलेल्या अॅक्सिस बँके जवळ असताना त्या देवदर्शनामध्ये व्यस्त आहेत हे पाहून त्यांना न कळता गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या गळयातील 80 हजार रूपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीमंगळसुत्र चोरट्याने हिसडा मारून चोरून नेले.देण्यात आलेल्या या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरूध्द तासगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Next Article