For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरिपुरात 2 लाखाचे दागिने लंपास! सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

05:20 PM Sep 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
हरिपुरात 2 लाखाचे दागिने लंपास  सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
Crime
Advertisement

सांगली प्रतिनिधी
घरातील उघड्या दरवाजातून आत येवून चोरट्याने कपाटातील 2 लाख 10 हजारचे सोन्याचे दा†गने लंपास कऊन पोबारा केला. ही घटना दि. 2 ते 6 सप्टेंबर या कालवधीत हरिपूर येथे घडली. याबाबत सदाशिव बाबुराव मगदुम (रा. संगमेश्वर मां†दराच्या पाठीमागे, हरिपूर, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सदाशिव मगदुम हे दिवाणजी म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी सदाशिव यांची सून प्रतीक्षा हिने घरातील बेडऊममधील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते. घरातील जिन्याचे दार उघडे होते. त्याचा फायदा घेवून चोरट्याने जिन्यातील दरवाजातून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेली कपाटाची चावी घेवून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले.

यामध्ये चेन, गंठन, तोड्याच्या बांगड्या याचा समावेश होता. जाताना चोरट्याने पुन्हा कपाटास लॉक लावून ा†कली जेथे होती तेथे ठेवली आा†ण पसार झाले. ही बाब दि. 6 सप्टेंबर रोजी ा†नदर्शनास आली. पा†लसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.