For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेवर गॅलरी डायमंड संघाने पटकावला विश्रुत चिट्स चषक

11:21 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
जेवर गॅलरी डायमंड संघाने पटकावला विश्रुत चिट्स चषक
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड  पुरसकृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स  तेरा वर्षाखालील मुलांच्या लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेवर गॅलरी डायमंड संघाने मॅक्स आनंद अकादमी संघाचा 8 गड्यांनी एकतर्फी पराभव करून विश्रुत  चिट्स लिटिल मास्टर्स चषक पटकाविला. युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत जेवर गॅलरी डायमंड संघाच्या कर्णधार मोहम्मद हमजाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मॅक्स आनंद अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना  25 षटकात 12 सर्व बाद 128 धावा केल्या. त्यात यश ठाकूरने 6 चौकारांसह 35, अद्वेत चव्हाणने 22, राजवीर कौजलगीने 15, आरुष देसुरकरने 14 धावा केल्या.

Advertisement

जेवर गॅलरी डायमंड तर्फे विवान भूसदने 3, मोहम्मद हमझा व सलमान धारवाडकर, अम्मार पठाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जेवर गॅलरी डायमंड जेवर गॅलरी डायमंड संघाने 21. 2 षटकात फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. त्यात कर्णधार मोहम्मद हमझाने 8 चौकारांसह नाबाद 56, कृष्णा पाटीलने 7 चौकारांसह 48 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यांसाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मॅक्स आनंद अकादमी तर्फे राजवीर कौजलगी व आरुष यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रमुख पाहुणे उमा कुंदरनाड सुजाता कुंदरनाड, सचिन पाचापुरे, राजू केलगेरी, सतीश नांदुरकर, अमित भूसद स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड, विकास देसाई, रोहित पोरवाल, संजय मोरे युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर यांच्या विजेत्या व उपविजेत्या संघाना  तर वैयक्तिक बक्षिसे पटकाविलेल्या उत्कृष्ट फलंदाज सचिन तलवार, उत्कृष्ट गोलंदाज शाहरुख धारवाडकर, स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू व अंतिम समन्यातील सामनावीर पुरस्कार विजेता मोहम्मद हमजा, मालिकावीर विवान भूसद, प्रॉमिसिंग खेळाडू साईराज पोरवाल यांना चषक प्राणपत्र देउन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात पंच म्हणून गणेश मुतकेकर, वीरेश गौडर व स्कोरर म्हणून शिवानंद पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद चव्हाण महांतेश देसाई अनिल गवी ज्योती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. चेतन बैलूर यांनी सूत्रसंचालन केले

Advertisement

Advertisement
Tags :

.