जेनिफरचे नाव वेगळ्या कारणासाठी चर्चेत मातब्बर नेत्यासोबत
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन ही नेहमीच चर्चेत असते. फेमस टीव्ही सिटकॉम फ्रेंड्सद्वारे जागतिक ओळख निर्माण करणारी जेनिफर स्वत:चे रिलेशनशिप आणि प्रेग्नंसीच्या अफवांमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचे नाव अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत जोडले जात आहे. मिशेल ओबामा आणि बराक ओबामा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू असताना या अफवांना बळ मिळाले आहे. इनटच मॅगजीनने बराक आणि जेनिफर यांच्या केमिस्ट्रीविषयी एक कव्हर स्टोरी सादर केली होती. मागील काही वर्षांमध्ये ओबामा आणि त्यांच्या पत्नीच्या नात्यात दुरावा आला आहे. मागील काही वर्षांमध्ये दोघांनाही एकत्र फारच कमीवेळा पाहिले गेले आहे. यामुळे दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याच्या अफवांना उधाण आले आहे. याचदरम्यान बराक यांचे नाव जेनिफरसोबत जोडले जाऊ लागले. तर दुसरीकडे जेनिफरने डेटिंगच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. जिमी किमेल शोमध्ये अभिनेत्रीला या अफवांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. मी ओबामा यांना एकदाच भेटली आहे. मी मिशेल यांना त्यांच्यापेक्षा अधिक ओळखते असे उत्तर जेनिफरने दिले. जेनिफर 2000 साली अभिनेता ब्रॅड पिटसोबत विवाहबद्ध झाली होती. परंतु दोघांचे हे नाते 5 वर्षे चालले आणि 2005 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर पिट आणि एंजेलिना यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. 2015 मध्ये जेनिफरने जस्टिन थिरोक्ससोबत विवाह केला होता. हा विवाह 2017 मध्ये संपुष्टात आला.