For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेनिफर लोपेझची नवी सिरीज येतेय

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेनिफर लोपेझची नवी सिरीज येतेय
Advertisement

अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ मागील काही काळापासून अभिनेता बेन एफ्लेकसोबतच्या घटस्फोटावरून चर्चेत आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. पती बेनपासून विभक्त होण्याच्या चर्चेदरम्यान जेनिफर लोपेझ आता स्वत:ची आगामी वेबसीरिज ‘हॅप्पी प्लेस’मुळे चर्चेत आली आहे. जेनिफरने अलिकडेच स्वत:च्या या आगामी सीरिजची घोषणा केली आहे. ही सीरिज एमिली हेन्री यांच्या कादंबरीवर आधारित आहे. या सीरिजकरता जेनिफरने नेटफ्लिक्ससोबत हातमिळवणी केली आहे.

Advertisement

एमिली हेन्री यांची हॅप्पी प्लेस नावाची कादंबरी असून एक हॅरियट आणि वेन या दांपत्याची कहाणी मांडते. या दोघांची भेट महाविद्यालयीन काळात होते, ज्यानंतर ते परस्परांमध्ये अत्यंत गुंतत जातात, परंतु काही कारणांमुळे दोघांचा ब्रेकअप होतो, दोघेही स्वत:च्या मित्रांशी याबद्दल चर्चा करत नाहीत. यानंतर एकदा स्वत:ला एका कॉटेजमध्ये एकाच बेडवर परस्परांसोबत असल्याचे त्यांना जाणवते, त्यानंतर ते अशाच जागेवर असतात, जेथे सर्व मित्रांसोबत त्यांनी काही वर्षांपूर्वी सुटी व्यतित केलेली असतात. दोघेही स्वत:च्या रिलेशनशिप स्टेटसवरून मित्रांशी खोटे बोलत असल्याचे या कादंबरीत चित्रण आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.