‘अनस्टॉपेबल’मध्ये जेनिफर
बेन एफ्लेकडून निर्मिती
जेनिफर लोपेझ स्वत:चा नवा चित्रपट ‘अनस्टॉपेबल’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विलियम गोल्डनबर्ग यांनी केले आहे. तर बेन एफ्लेक याचा सहनिर्माता आहे. जेनिफर स्वत:च्या घटस्फोटामुळे सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चित्रपटासोबत जेनिफर तसेच बेन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल मतं मांडली आहेत.
जेनिफर आणि बेन यांच्यापैकी बेनला मी अधिक चांगला ओळखतो. अनस्टॉपेबलमध्ये जेनिफरसोबत काम करणे स्वप्नवत होते असे विलियम यांनी सांगितले आहे. विलियम यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. जेनिफर लोपेझने 20 ऑगस्ट रोजी बेन एफ्लेकपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
अनस्टॉपेबलच्या सेटवर कुठल्याही प्रकारचा तणाव नव्हता. जेनिफर आणि बेन यांचे वैयक्तिक आयुष्य हे त्यांचे आहे. तर सेटवर प्रत्येक जण प्रोफेशनलपणे वागत होता. यामुळे तेथे कुठलीच विचित्र स्थिती नव्हती असे विलियम यांनी सांगितले आहे. बेननेच चित्रपटात जेनिफरची मुख्य भूमिकेसाठी निवड केली होती. अनस्टॉपेबल हा एक बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून यात जेनिफरने पैलवान एंथनी रॉबल्सची आई जूडी यांची भूमिका साकारली