‘रायसिघानीन व्हर्सेस रायसिंघानी’ मध्ये जेनिफर
06:20 AM Jan 30, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
तर करण वाही यात विराट रायसिंघानीच्या भूमिकेत आहे. सोनी लिव्हने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शोमध्ये कोर्टरुम ड्रामा दिसून येणार आहे. अनुष्का ही स्वत:च्या वडिलांच्या लॉ फर्ममध्ये स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत असल्याचा आणि प्रत्येक प्रकरणी स्वत:ची नैतिक मूल्ये जपत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. दुसरीकडे विराट ही व्यक्तिरेखा कंपनीचा खरा उत्तराधिकारी असल्याचे मानले जात असल्याचे दाखविले जाणार आहे.
Advertisement
प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट आता स्वत:चा नवा शो ‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’मधून पुनरागमन करत आहे. या शोमध्ये तिच्यासोबत करण वाही दिसून येणार आहे. प्रेक्षकांना आता या शोची उत्सुकता लागून राहिली आहे. जेनिफर यात अनुष्का रायसिंघानी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Advertisement
Advertisement
या शोमध्ये करीम शेख आणि संजय नाथ हे कलाकारही दिसून येतील. हा एक मनोरंजक कोर्टरुम ड्रामा असून यात तीन वकिलांचे जीवन, नैतिक पेच असे अनेक पैलू दिसून येतील. हा शो लवकरच सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.
Advertisement
Next Article