महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जेबॉर, साबालेंकाला पॅरिस ऑलिम्पिक हुकणार

06:15 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तृतीय मानांकित महिला टेनिसपटू आर्यना साबालेंका तसेच ट्युनेशियाची 10 वी मानांकित ऑन्स जेबॉर सहभागी होणार नाही. मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना साबालेंका आणि जेबॉर यांनी ही माहिती दिली. आगामी उन्हाळी मोसमात हार्डकोर्टवरील स्पर्धेसाठी पूर्वतयारी करण्याकरीता आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे साबालेंकाने सांगितले. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला तंदुरूस्तीच्या समस्या सातत्याने जाणवत असल्याने मला खबरदारी घेणे गरजेचे आहे. 1992 च्या बार्सिलोनानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक टेनिस स्पर्धा यावेळी रेड क्लेकोर्टवर खेळवली जात आहे. दरम्यान जुलै महिन्यात विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर टेनिसपटूंना रेड क्लेकोर्टवर खेळावे लागणार आहे. तातडीचा बदल होत असल्याने टेनिसपटूंना जुळवून घेणे अवघड राहिल, असेही सबालेंकाने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat#TARUBN
Next Article