जयसूर्या लंकन संघाचे प्रमुख प्रशिक्षक
वृत्तसंस्था / कोलंबो
माजी कर्णधार आणि सलामीचे आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याची लंकन क्रिकेट मंडळाने 2026 साली होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत पूर्णवेळेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
गेल्या जुलै महिन्यात लंकन क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी जयसूर्याची नियुक्ती केली होती. त्यानंतर भारत आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये लंकन संघाच्या कामगिरीमध्ये खूपच सुधारणा झाल्याचे दिसून आले आणि याचे श्रेय सनत जयसूर्याच्या मार्गदर्शनाला देण्यात आले. तब्बल 27 वर्षांनंतर लंकन संघाने भारताविरुद्धची द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली होती. तसेच त्यांनी 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा कसोटी सामन्यात पराभव केला होता. दरम्यान अलिकडेच झालेल्या माय देशातील कसोटी मालिकेत लंकेने न्यूझीलंडचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. लंकन संघातील खेळाडूंना सनत जयसुर्याचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याने या संघाच्या कामगिरीमध्ये चांगलीच सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून सनत जयसुर्या लंकन संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून सुत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत राहिल. 13 ऑक्टोबरपासून लंका आणि विंडीज यांच्यात मर्यादीत षटकांच्या मालिकेला डंबुला येथे प्रारंभ होत आहे.