For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जे होतं ते चांगल्यासाठीच ; केसरकरांचे हे वक्तव्य दुर्दैवी

12:17 PM Aug 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जे होतं ते चांगल्यासाठीच   केसरकरांचे हे वक्तव्य दुर्दैवी
Advertisement

असा आमदार आणि मंत्री आता नकोच ; सावंतवाडीतून जयंत पाटीलांचे केसरकरांवर टीकास्त्र

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी आहे. पुतळा कोसळला यातून चांगले घडेल असे म्हणणे खूपच दुर्दैवी आहे.अशी टीका आज येथे जयंत पाटील यांनी केली . मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. सरकारने नौदलावर उगाच टीका करू नये किंवा दोष देऊ नये या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या चौकशी समितीमध्ये विधान परिषद व विधानसभेचे अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायाधीश यांचा समावेश करून समिती गठीत करावी. हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारी आणि पैसे खाणारे सरकार आहे त्यामुळे हे सरकार निश्चितपणे आता जाणार आहे. या सरकारला कुठलीही लाज शरम राहिलेली नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी आहे. पुतळा कोसळला यातून चांगले घडेल असे म्हणणे खूपच दुर्दैवी आहे. हा पुतळा ज्या शिल्पकाराकडून बनवून घेतला होता ते आपटे नामक शिल्पकार हे कोणाचे जवळचे आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे या प्रकरणात ज्याने आपटेंना हा पुतळा बनवण्यास सांगितले त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा .. व त्यांची चौकशी व्हायला हवी. श्री आपटे हे कल्याण , ठाणे मधलेच कसे काय सापडले असा सवालही त्यांनी केला. बदलापूर आणि मालवण प्रकरणात दोन्ही आपटे नामक व्यक्ती आहेत आणि त्यांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे अशीही टीका त्यांनी केली . सावंतवाडी मध्ये रेल्वे टर्मिनस ,मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अद्याप का झाले नाही त्यामुळे आता या भागाचा आमदार बदला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या अर्चना घारे परब हे चांगले काम करत आहेत त्यांच्या पाठीशी राहा असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत ,महिला नेत्या अर्चना घारे परब. ,महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट रेवती राणे,एडवोकेट सायली दुभाषी, सौ नम्रता कुबल, जॉनी डिसोजा, आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.