महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कै .जयानंद मठकर पुरस्कार दै. तरुण भारत संवादचे उपसंपादक अवधूत पोईपकर यांना जाहीर

10:02 PM Jan 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा यावर्षीचा माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै जयानंद मठकर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे उपसंपादक अवधूत पोईपकर यांना जाहीर करण्यात आला.तसेच यावेळी पत्रकार संघाच्या इतर पाच पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. शनिवारी सायंकाळी सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक पुढारीचे सावंतवाडी वार्ताहर नागेश पाटील यांना, कै पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार आरोंदा येथील ज्येष्ठ पत्रकार महादेव परांजपे यांना, नाट्यकर्मी कै बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार दैनिक प्रहारचे बांदा प्रतिनिधी प्रविण परब यांना, तर आदर्श समाजसेवक कै चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार पत्रकार विश्वनाथ नाईक यांना, ज्येष्ठ  छायाचित्रकार कै मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार दैनिक लोकमत बांदा प्रतिनिधी अजित दळवी यांना जाहीर करण्यात आला.सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या या पुरस्कार निवड समितीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कुमार चौगुले आहार तज्ञ डॉ विनया बाड, उद्योजक उदय भोसले, अँड संदीप निंबाळकर, जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्यावाह प्रवीण मांजरेकर, गतवेळचे आदर्श पत्रकार विजेते सागर चव्हाण, पत्रकार सचिन रेडकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांचा समावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article