माडखोल उपसरपंच कृष्णा राऊळ यांचा राजीनामा
वैयक्तिक कारणास्तव दिला राजीनामा
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल ग्रामपंचायतीचे उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा मंगळवारी सरपंच सौ शृश्नवी राऊळ यांच्याकडे दिला.माडखोल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. मंगळवारी त्यांच्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी माडखोल गावाच्या विकास कामात महत्त्वाचे योगदान दिले. मात्र दोन वर्षाच्या कार्यकाळानंतर मंगळवारी कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा सरपंच शृश्नवी राऊळ आणि ग्रामसेवक अमित राऊत यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी ग्रामसेवक अमित राऊळ, देवस्थानचे मानकरी दत्ताराम राऊळ, माजी सरपंच संजय राऊळ, ग्रामपंचायत सदस्य देविदास राऊळ आदी उपस्थित होते.