For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संसदीय स्थायी समितीतून जया बच्चन यांची माघार

06:48 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
संसदीय स्थायी समितीतून  जया बच्चन यांची माघार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयक संसदीय स्थायी समितीमधून माघार घेतली आहे. जया बच्चन यांच्या जागी तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कामगार संसदीय समितीचे सदस्य होते. राज्यसभा सचिवालयाच्या बुलेटिननुसार, जया बच्चन आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखालील कामगार, वस्त्राsद्योग आणि कौशल्य विकास विषयक संसदीय स्थायी समितीच्या सदस्या असतील. हा बदल करण्यामागील नेमके कारण बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.