महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पॅरालिम्पिक : भालाफेकपटू सुमितला सुवर्णासह नव्या विक्रमाचे वेध

06:45 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टोकियो पॅरालिकमधील सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू सुमित अँटीलला पॅरिस गेम्समधील पुऊषांच्या एफ-64 प्रकारात आपले जेतेपद राखून ठेवण्याबरोबर त्याच्या विश्वविक्रमात सुधारणा करायची आहे. भाग्यश्री जाधव (गोळाफेक, एफ-34 श्रेणी) हिच्यासोबत सुमित 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक असेल.

Advertisement

त्याने टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये तीन वेळा विश्वविक्रम केला होता आणि 68.55 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. त्याने 2023 मधील पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 70.83 मीटरची जागतिक विक्रम करणारी भालाफेक करून त्यात सुधारणा केली आणि हांगझाऊ पॅरा आशियाई खेळांमध्ये 73.29 मीटरच्या प्रयत्नासह सुवर्णपदक जिंकताना नव्याने विक्रमाची नोंद केली.

‘एफ-64’ श्रेणी कंबरेखालच्या भागात समस्या असलेल्या अॅथलीट्ससाठी आहे. ‘80 मीटर अंतर गाठणे हे माझे दीर्घकालीन ध्येय आहे परंतु पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मी 75 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण जिंकण्याचा प्रयत्न करेन’, असे या 26 वर्षीय तऊणाने एका खास मुलाखतीत सांगितले. 2015 मध्ये झालेल्या रस्ता अपघातात आपला एक अवयव गमावलेल्या या अॅथलीटने यावर्षी मे महिन्यात झालेल्या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 69.50 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. ‘सरावादरम्यान माझी भालाफेक बरीच सातत्यपूर्ण राहिली आहे. मी तंत्रात बदल न करता ताकद वाढवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. मी माझा पूर्वीचा विक्रम सुधारण्याचा प्रयत्न करेन’, असे सुमितने म्हटले आहे.

गतविजेता आणि भारताचा ध्वजवाहक असल्याने दबाव आहे का असे विचारले तो म्हणाला, ‘सध्या कोणतेही दडपण नाही, परंतु पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर गोष्टी कळतील. एकदा का तुम्ही गेम्स व्हिलेज किंवा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलात की, गोष्टी थोड्या वेगळ्या होतात. मी दबाव न घेता सर्वोत्तम प्रयत्न करेन. मला या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. पहिल्यांदाच भारताची एवढी मोठी व मजबूत तुकडी पॅरालिम्पिकमध्ये जात आहे आणि ध्वजवाहक असल्याचा मला अभिमान वाटतो’, असे तो पुढे म्हणाला. भारतीय संघात 12 क्रीडाप्रकारांतील 84 खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article