महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्री देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव आजपासून

12:11 PM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा 89 वा महान जत्रोत्सव  आज मंगळवार दि. 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. आज दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराचा 89 वा महान जत्रोत्सव होणार असून दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 4 वा. नवदुर्गा दिंडी पथक बोरी गोवातर्फे दिंडी सादर करण्यात येईल. सायं. 6 वा. भजन, रात्री 12 वा. पारंपरिक पौराणिक दशावतारी नाटक ‘कालचक्र’ सादर होईल. गुऊवार दि. 25 रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 5.30 वा. रेश्मा गवस यांचे तबला वादन, सायं. 7 वा. चांदणे स्वरांचे हा मराठी भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते, नाट्यागीते, युगुलगीते यांचा सुरेल कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी 10 वा. पिकअप-ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 5.30 वा. कीर्तन, सायं. 6.15 वा. डॉ. राजेश भटकुर्से तबला वादन सादर करतील. सायं. 7.15 वा. नक्षत्रांचे देणे हा गायनाचा कार्यक्रम होईल.

Advertisement

शनिवार दि. 27 रोजी सकाळी 10 वा. म्हापशातील मासळी विक्रेत्या महिलांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 5.15 वा. स्वर अक्षय हा मराठी भावगीत, भक्तीगीत, नाट्यागीतांचा आणि विविधरंगी गाण्याचा कार्यक्रम होईल. रात्री 8.30 वा. सिद्धकला डान्स अकादमी अॅण्ड इव्हेंट्स जान्हवी बोंद्रे सांस्कृतिक नृत्यांचा कार्यक्रम ‘मोहक’ सादर करणार आहेत. रविवार दि. 28 रोजी सकाळी 10 वा. रिक्षा-ड्रायव्हर असोसिएशन (कदंब स्टॅण्ड) म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सायं. 5.30 वा. ‘स्वरांचे सार्थक’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री 8.30 वा. सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम ‘मुद्रा’ होईल.

Advertisement

सोमवार दि. 29 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 6.30 वा. दिंडी, रात्री 8.30 वा. डान्स व्हाईब्स’ हा नृत्याचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा भाजी विक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सायं. 5.30 वा. ‘स्वर अभिषेक’ हा अभंग, भक्तीगीत, नाट्यागीत व भावगीतांचा र्काक्रम सादर होईल. बुधवार दि. 31 रोजी सायं. 5.30 वा. ‘स्वरांजली’ मराठी सुगम संगीत, भावगीत, भक्तीगीत, अभंग व नाट्यागीतांचा कार्यक्रम होईल. गुऊवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सायं. 5.30 वा. नृत्यमार्ग हा नृत्याचा कार्यक्रम होईल. सायं. 7.30 वा. सुर ईश्वर हा अभंग, भक्तीगीत, नाट्यासंगीत व भावगीताचा कार्यक्रम, शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा बाल भवनच्या मुलांचा गायन, वादन, नृत्याचा रंगारंग कार्यक्रम होईल. शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. कला व संस्कृती संचालनालय, पणजी पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम, सायं. 7.30 वा. सांस्कृतिक नृत्यांचा कार्यक्रम, रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. स्वर चैतन्याचे हा अभंग, भक्तीगीत, नाट्यासंगीत व भावगीतांचा कायक्रम तर रात्री 8 वा. भारतनाट्याम सादर होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article