Jat News: मंगळवारी जतचा आठवडी बाजार व मार्केट कमेटी राहणार बंद
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार ठेवण्याचे आदेश
जत: येत्या मंगळवारी जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी भरणारा जत येथील आठवडा बाजार तसेच मार्केट कमिटीच्यावतीने होणारे शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी काकडे यांनी दिलेल्या आदेशाने जतचा आठवडी बाजार व मार्केट कमेटीचे कार्यालय व सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, दोन डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीनिमित्त राज्य निवडणूक आयोगाने सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे., जत नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांच्या आदेशानुसार त्या दिवशी होणारा आठवडा बाजार पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी नमूद केले आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनाही यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धपत्रकात मंगळवारी जत येथील दुय्यम बाजार आवारातील सर्व व्यवहार शेतीमाल खरेदी-विक्री सौदे व तोल पूर्णतः बंद राहतील तसेच बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज देखील दिवसभर बंद राहणार आहे. जत येथील आडते व्यापारी, हमाल, तोलाईदार तसेच इतर संबंधित घटकांना याची नोंद घेण्याचे आवाहन महेश चव्हाण यांनी केले आहे.