महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जसप्रीत बुमराह डिसेंबरमधील सर्वोत्तम खेळाडू

06:50 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अॅनाबेल सदरलँडला मान

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत केलेल्या धडाकेबाज कामगिरीनंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मंगळवारी डिसेंबर, 2024 मधील आयसीसी पुऊष खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. भारताचे आक्रमण जवळजवळ एकहाती सांभाळत बुमराहने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामन्यांमध्ये 14.22 च्या उत्कृष्ट सरासरीने 22 बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तीव्र दबावाखाली ठेवले.

5 जानेवारी रोजी संपलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने 32 बळी घेतले. पहिला सामना नोव्हेंबरमध्ये खेळला गेला. त्याच्या महत्त्वाच्या योगदानात ब्रिस्बेनमधील नऊ बळींचा तसेच मेलबर्नमधील पाच बळींचा समावेश राहिला. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेन पॅटरसनला मागे टाकून हा पुरस्कार पटकावला आहे, असे आयसीसीने म्हटले आहे. याशिवाय यादरम्यान एक महत्त्वाचा टप्पा गाठताना 20 पेक्षा कमी सरासरीने 200 कसोटी बळी घेणारा तो पहिला गोलंदाज बनला.

अॅडलेडमध्ये पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी ठेवण्यात बुमराहच्या चार बळींनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये पहिल्या डावात सहा बळी आणि दुसऱ्या डावात तीन बळी या त्याच्या प्रयत्नांमुळे पावसामुळे प्रभावित हा सामना अनिर्णित राहिला आणि भारताचे आव्हान मालिकेत जिवंत राहिले. मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत बुमराहने आणखी एक उत्कृष्ट कामगिरी करताना पहिल्या डावात चार, तर दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. त्याच्या कामगिरीनंतरही भारताची फलंदाजी डळमळीत झाली आणि परिणामी 184 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 1-3 अशी गमावली असली, तरी या मालिकेत बुमराह एकमेव योद्धा म्हणून उदयास आला. त्याबद्दल त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला.

दरम्यान, ‘आयसीसी’ने ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अॅनाबेल सदरलँडची डिसेंबर, 2024 मधील आयसीसी महिला खेळाडू म्हणून निवड केली आहे. डिसेंबरमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये (भारताविऊद्ध तीन आणि न्यूझीलंडविऊद्ध दोन) ऑस्ट्रेलिया अपराजित राहण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या या अपवादात्मक कामगिरीबद्दल तिला तीन सामनावीर पुरस्कार आणि दोन्ही मालिकांतील मालिकावीराचा किताब मिळाला. तिने हा पुरस्कार मिळविताना स्मृती मानधना आणि नोनकुलुलेको म्लाबा यांना मागे टाकले. सदरलँडने डिसेंबर महिन्यात 269 धावा केल्या आणि नऊ बळी घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article