महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाओलिनी अंतिम फेरीत

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

Advertisement

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सातव्या मानांकित जस्मिन पाओलिनीने अंतिम फेरी गाठताना डोना व्हेकिकचा पराभव केला तर पुरुष दुहेरीत मार्सेल ग्रॅनोलर्स व जॉर्डन थॉमसन यांनी अंतिम फेरी गाठली. महिला एकेरीत जस्मिन पाओलिनीने डोना व्हेकिकची विजयी घोडदौड 2-6, 6-4, 7-6 (10-8) अशी रोखत पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळविले. रायबाकिना व क्रेसिकोव्हा यांच्यातील विजयी खेळाडूशी तिची जेतेपदाची लढत शनिवारी होईल.

Advertisement

पुरुष दुहेरीत ग्रॅनोलर्स व थॉमसन यांनी होरोसियो झेबालोस व मॅक्स पर्सेल यांच्यावर 6-4, 6-4 अशी मात करून अंतिम फेरी गाठली. महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत गॅब्रिएला डाब्रोवस्की व एरिन रूटलिफ यांनी लॉरा सिगमंड व बार्बोरा क्रेसिकोव्हा यांचे आव्हान 6-4, 6-7 (5-7), 6-4 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. महिला दुहेरीच्या अन्य एका सामन्यात सिनियाकोव्हा व टाऊनसेंड यांनी ल्युडमिला किचेनॉक व एलेना ओस्टापेन्को यांचा 6-1, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article