For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-पाकिस्तान महिलांची लढत आज

06:30 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत पाकिस्तान महिलांची लढत आज
Advertisement

आशिया चषक टी-20 स्पर्धा : हरमनप्रीत कौरचा संघ अलीकडील फॉर्म कायम राखण्यास उत्सुक

Advertisement

वृत्तसंस्था /डंबुला

महिलांच्या आशिया चषक स्पर्धेला आज शुक्रवारी गतविजेता भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सामन्याने धडाक्यात सुऊवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी आठ संघ ऑक्टोबरमध्ये होणार असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या आधी आपली रचना मजबूत करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचा वापर करतील. हरमनप्रीत कौरचा भारत हा आशिया कपचा सर्वांत भक्कम दावेदार आहे. या स्पर्धेची टी-20 आवृत्ती त्यांनी चारपैकी तीन वेळा आणि 50 षटकांच्या सामन्यांच्या स्वरूपात सर्व चार वेळा जिंकली आहे. याव्यतिरिक्त भारताने महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेमधील 20 सामन्यांमध्ये 17 विजय नोंदवलेले असून तो सर्वांत यशस्वी संघ आहे. 2022 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी बांगलादेशचा पराभव केला होता.

Advertisement

पाकिस्तानविऊद्ध भारताची या सर्वांत लहान प्रकारातील कामगिरीही अशीच उत्कृष्ट आहे. आतापर्यंतच्या 14 सामन्यांत त्यांनी फक्त तीन पराभव पत्करलेले असून 11 विजय मिळविलेले आहेत आणि कौरचा संघ अलीकडील सामन्यांमध्ये दाखविलेला चांगला फॉर्म पुढे नेत आजच्या सामन्यात विजय नोंदविण्यास इच्छुक असेल. भारत या महिन्याच्या सुऊवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मालिकेतील 1-1 बरोबरीतून येथे आला आहे. त्या तीन टी-20 सामन्यांपैकी दुसरा सामना पावसात वाहून गेला होता.दुसरीकडे, पाकिस्तानचा सामन्यांचा अनुभव इतका ताजा नाही तसेच त्यांचा आत्मविश्वासही कमी असेल. कारण त्यांचा शेवटचा सामना मे महिन्यात इंग्लंडमध्ये झाला होता आ.णि यजमानांनी त्यांना 3-0 ने धूळ चारली होती. स्मृती मानधनाचा फलंदाजीतील

फॉर्म हे भारताचे सर्वांत मोठे शस्त्र असेल. परंतु अलीकडे खेळलेल्या सर्व स्वरूपांतील सामन्यांतून दिसून आलेला सर्वांत मोठा फायदा म्हणजे भारताच्या गोलंदाजीला चांगला आकार मिळाला आहे आणि वेगवान गोलंदाज व फिरकीपटूंनी चांगले प्रदर्शन घडविलेले आहे. भारताची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारने दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या तीन सामन्यांमध्ये घेतलेले आठ बळी तिच्या फॉर्मचे संकेत देतात. त्याव्यतिरिक्त, फिरकीपटू राधा यादवचे यशस्वी पुनरागमन उत्साहवर्धक आहे. फिरकी आक्रमणात दीप्ती शर्मा, सजीवन सजना आणि श्रेयंका पाटील यांचाही समावेश आहे.

जरी पाकिस्तानने आशिया चषकासाठी निदा दारला कर्णधार म्हणून कायम ठेवले असले तरी, इंग्लंडमधील पराभवानंतर संघात लक्षणीय फेरबदल झाले आहेत. इरम जावेद, ओमामा सोहेल, सय्यदा अरूब शाह या तीन खेळाडूंना त्यांनी यावर्षी एकही सामना खेळलेला नसूनही नवोदित तस्मिया ऊबाबसह समाविष्ट केले गेले आहे, तर सहा खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ‘अ’ गटात नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश आहे. त्यांचा सामना त्यापूर्वी दुपारी 2 वा. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर  होणार आहे.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा, अऊंधती रे•ाr, रेणुका सिंग, डी. हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना.

पाकिस्तान : निदा दार (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजिहा अल्वी, नशरा संधू, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया ऊबाब, तुबा हसन.

Advertisement
Tags :

.