छत्रपती शिवाजी उद्यान परिसरामध्ये मनोज जरांगे-पाटील यांची होणार सभा
06:36 AM Apr 28, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा मंगळवार दि. 30 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानाच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये होणार आहे. या सभेला जिल्ह्यातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Advertisement
मनोज जरांगे-पाटील हे बेळगावमध्ये पहिल्यांदाच येत आहेत. मराठा बांधवांना ते मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या नागरिकांनी उपस्थित रहावे. मराठा समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून केलेले उपोषण संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यांच्या सभांना महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थिती असते. तशाच प्रकारे बेळगावातही उपस्थिती राहणे गरजेचे आहे. तेव्हा मराठा समाजाने याची दखल घ्यावी व या सभेला उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.
Advertisement
Next Article