जपानची ह्यूमन वॉशिंग मशीन व्हायरल
केवळ आत झोपा, शरीर आपोआप स्वच्छ होणार
जगातील चित्रविचित्र तंत्रज्ञानात आता आणखी एक नवे नाव जोडले गेले आहे. ह्यूमन वॉशिंग मशीन यापूर्वी ओसाका वर्ल्ड एक्स्पोमध्ये दिसून आली होती. परंतु आता ही जपानच्या बाजारपेठेत अधिकृत स्वरुपात विक्रीसाठी दाखल झाली आहे. जपानी तंत्रज्ञान कंपनी सायन्स इंकने याची निर्मिती केली आहे. ही मशीन एका मोठ्या कॅप्सूलमध्ये आहे. यात माणूस आत पहुडतो, झाकण बंद होते आणि मशीन त्याला डोक्यापासून पायापर्यंत धुवून देते. आत मंद, आल्हाददायक संगीत सुरू असते आणि पूर्ण अनुभव एखाद्या स्पासारखा वाटतो.
1970 च्या मशीनचे आधुनिक रुप
या मशीनला ‘भविष्यातील ह्यूमन वॉशर’ म्हटले जातेय. ओसाका एक्स्पो 2025 दरम्यान ही मशीन पाहण्यासाठी लाखो लोक पोहोचले. 1970 च्या ओसाका एक्स्पोमध्येही अशाचप्रकारची मशीन दाखविण्यात आली होती. त्यावेळी ही मशीन पाहून कंपनीचे वर्तमान अध्यक्ष अत्यंत प्रभावित झाले होते आणि त्याच आठवणीला पुढे नेत हे आधुनिक वर्जन तयार करण्यात आले आहे. हे मशीन केवळ शरीर साफ करत नसून ‘आत्माही धुवून देतेय’, कारण यात लावलेले सेंजर युजरची हार्टबीट आणि अन्य संकेतांवर नजर ठेवतात असे जपानी कंपनीच्या प्रवक्त्या साचिको माएकुरा यांचे मशीनसंबंधी सांगणे आहे.
पहिले युनिट हॉटेलकडून खरेदी
अमेरिकेसह अनेक देशांच्या रिसॉर्ट मालकांनी या मशीनमध्ये रुची दाखविली आहे. पहिले युनिट ओसाकाच्या एका हॉटेलने खरेदी केले आहे. या हॉटेलमध्ये अतिथींना याचा अनुभव घडवून आणला जाणार आहे. याच्या युनिकनेसमुळे सध्या केवळ 50 मशीन्सच तयार केल्या जाणार आहेत. याची किंमत 60 दशलक्ष येन म्हणजेच सुमारे 3.85 लाख डॉलर्स असल्याचे कंपनीने सांगितले.
ह्यूमन वॉशिंग मशीनचे कार्यस्वरुप
1 कॅप्सूलमध्ये आडवे व्हा.
युजर 2.3 मीटर लांब पॉडमध्ये झोपतो आणि झाकण बंद होते.
2 ऑटोमॅटिक बॉडी वॉश
मशीन मायक्रोबबल्स आणि फाइन मिस्ट शॉवरद्वारे शरीराला हळूहळू साफ करतात.
3 हेल्थ मॉनिटरिंग
सेंसर सातत्याने हार्टबीट आणि अन्य संकेतांची देखरेख करतात.
4 रिलॅक्सेशन मोड
धून्स आणि आल्हाददायक व्हिज्युअल्ससोबत पूर्ण वातावरण स्पासारखे होते.
5 ड्राय करण्याची सुविधा
वॉशिंगनंतर मशीन स्वत:हून शरीर कोरडे करून देते.
6 केवळ 15 मिनिटांमध्ये पूर्ण अनुभव जवळपास 15 मिनिटात युजर पूर्णपणे साफ, कोरडा आणि रिलॅक्स होऊन बाहेर पडतो, कुठलेही टॉवेल किंवा अतिरिक्त मेहनतीची गरज भासत नाही.