For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानच्या होरीगोमेचे दुसरे ऑलिम्पिक सुवर्ण

06:25 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
जपानच्या होरीगोमेचे दुसरे ऑलिम्पिक सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या स्ट्रीट स्केटबोर्डिंग क्रीडा प्रकारात जपानच्या युटो होरीगोमेने सुवर्ण पदक पटकाविले. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत स्ट्रीट स्केटबोर्डिंग या नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आला होता.

जपानच्या 25 वर्षीय होरीगोमेने अमेरिकेच्या जॅगेर इटॉन आणि हस्टन यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकविले. होरीगोमेने या क्रीडा प्रकारात 97.08 गुणांची नोंद केली. या क्रीडा प्रकारातील होरीगोमेचे हे सलग दुसरे सुवर्ण पदक आहे.  होरीगोमेने अमेरिकेच्या इटॉनला केवळ 0.1 गुणाने मागे टाकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. इटॉनने रौप्य पदक तर हस्टनने कास्यपदक मिळविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.