For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानी वैज्ञानिकांकडून कृत्रिम रक्ताची निर्मिती

06:22 AM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
जपानी वैज्ञानिकांकडून कृत्रिम रक्ताची निर्मिती
Advertisement

जगभरात दररोज दुर्घटना किंवा आपत्कालीन स्थितीत आवश्यक रक्ताच्या कमतरतेमुळे मोठ्या संख्येत लोकांचा मृत्यू होतो. भारतात दरदिनी अनेक रुग्णांना वेळेत रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. देशात वार्षिक 1.5 कोटी युनिट रक्ताची आवश्यकता आहे, परंतु रक्तदान शिबिर आणि अन्य माध्यमांमधून केवळ एक कोटी युनिट रक्तच प्राप्त होत असते. जपानमधील तज्ञांच्या टीमने आता या समस्येवर उपाय शोधला आहे. जपानी वैज्ञानिकांनी रक्ताच्या या कमतरतेला दूर करण्यासाठी कृत्रिम रक्त विकसित केले आहे.

Advertisement

शेल्फ लाइफही अधिक

कृत्रिम रक्ताला खऱ्या रक्ताच्या पर्यायादाखल वापरले जाऊ शकते. याचबरोबर याचा वापर कुठल्याही रक्तगटासाठी केला जाऊ शकतो आणि ते रेफ्रिजरेशनशिवाय दीर्घकाळापर्यंत सुरक्षितही ठेवले जाऊ शकते. आपत्कालीन वैद्यकीय स्थितीदरम्यान उद्भवणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानाला दूर करणे आणि लोकांचा जीव वाचविण्यास हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे तज्ञांचे मानणे आहे.

Advertisement

जपानच्या नारा मेडिकल युनिव्हर्सिटीचे संशोधक चालू वर्षात क्लीनिकल ट्रायल करणार असून यात सामान्य स्वरुपात फेकण्यात आलेले अन् एक्सपायर झालेल्या रक्ताला कृत्रिम रक्तपेशींमध्ये बदलून पुन्हा वापरता येऊ शकते का, याचे परीक्षण केले जाणार आहे. याचबरोबर आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रारंभिक परीक्षणाच्या प्रभाविकतेचीही तपासणी केली जाणार आहे.  परीक्षण यशस्वी ठरल्यास जपान 2030 पर्यंत चिकित्सा प्रणालींमध्ये कृत्रिम रक्ताचा वापर करणारा पहिला देश ठरू शकतो.

दुष्प्रभाव अन् प्रभाविकतेसाठी तपासणी

नारा मेडिकल युनिव्हर्सिटीच्या परीक्षणाच्या प्रारंभिक टप्प्यांमध्ये मार्चमध्ये 16 प्रौढांना 100-400 मिलीमीटर कृत्रिम रक्त चढविण्यात आले. या परीक्षणाच्या पुढील टप्प्यात उपचाराची प्रभावकता आणि सुरक्षेची पडताळणी केली जाणार आहे. या कृत्रिम रक्तात विशिष्ट मार्कर नसतात, जे सर्वसाधारणपणे याच्या रक्तगटाला निर्धारित करतात. अशा स्थितीत याला क्रॉस-मॅचिंगशिवाय कुठल्याही रुग्णात सुरक्षितपणे चढविले जाऊ शकते. कृत्रिम रक्त विषाणूमुक्तही असेल आणि दान केलेल्या मानवी रक्ताच्या तुलनेत याचे शेल्फ लाइफही मोठे असणार आहे.

तज्ञांचे मत

इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीत स्कूल ऑफ बायोकेमिस्ट्रीत सेल बायोलॉजीचे प्राध्यापक एश टॉय यांनी यासंबंधी मत व्यक्त केले आहे. ह्यूमन हीमोग्लोबिनने प्राप्त कृत्रिम रक्ताचा वापर करून जपानमध्ये एका नव्या नैदानिक परीक्षणाची सुरुवात संभाव्य स्वरुपात रोमांचक पाऊल आहे. या क्षेत्रात दीर्घकाळापासून शक्यता आहेत, या पूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरे जावे लागले होते. विशेषकरून सुरक्षा, स्थिरता आणि ऑक्सिजन वितरण प्रभावकतेवरून असे टॉय यांनी म्हटले आहे.

प्रारंभिक निष्कर्ष आशादायक

रक्त आधानची तत्काळ आवश्यकता असते तेव्हा अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. कृत्रिम लाल रक्त पेशींसोबत रक्तगटांविषयी चिंता करण्याची कुठलीच आवश्यकता नाही, याचमुळे आधान प्रक्रिया लवकर केली जाऊ शकते. हे तंत्रज्ञान सध्या नैदानिक परीक्षणाच्या टप्प्यांमध्ये आहे, परंतु प्रारंभिक निष्कर्ष आशादायक आहेत, असे उद्गार नारा मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हिरोमी साकाई यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.