येस बँकेतील अतिरिक्त हिस्सेदारी जपानची कंपनी करणार खरेदी
9,400 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता
मुंबई
जपानी कंपनी सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप (एसएमएफजी) 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,400 कोटी रुपये) गुंतवण्याची योजना आखत आहे. जपानी कंपनी एसएमएफजी भारतातील खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेत 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,400 कोटी रुपये) गुंतवण्याची योजना आखत आहे. याशिवाय कंपनी बँकेत 5 टक्के अतिरिक्त हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार करत आहे.
एसएमएफजी संभाव्य करारांतर्गत कार्लाइल ग्रुप आणि इतर विद्यमान शेअरहोल्डर्सकडून सुमारे 5 टक्के हिस्सेदारी खरेदी करू शकते. यासोबतच, येस बँक कन्व्हर्टिबल बॉण्ड्समध्ये सुमारे 680 दशलक्ष डॉलर (5,800 कोटी) गुंतवण्याची योजना आखत आहे. या करारामुळे मंगळवारी येस बँकेचा शेअर 3 टक्केने वाढला. बाजार बंद होईपर्यंत शेअर 2.30 टक्क्यांनी वाढून 20.45 रुपयांवर बंद झाला. मे महिन्याच्या सुरुवातीला, एसएमएफजीने येस बँकेतील 20 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली होती.
हा करार 21.5 प्रति शेअर या किमतीने 13,483 कोटी रुपयांना करण्यात आला. एसबीआय या करारातील त्यांची 13.19 टक्के हिस्सेदारी 8,889 कोटी रुपयांना विकणार आहे. उर्वरित 6.81 हिस्सेदारी अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या 7 बँकांकडून 4,594 कोटी रुपयांना खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे.
रिझर्व्ह बँकेची मान्यता आवश्यक
आरबीआय आणि सीसीआय सारख्या नियामकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा करार पूर्ण केला जाईल. एसएमबीसीचे अध्यक्ष अकिहिरो फुकुटोमे म्हणाले की भारत आमच्यासाठी प्राधान्य आहे. येस बँकेसोबतची ही गुंतवणूक आमच्या दीर्घकालीन धोरणाचा एक भाग आहे. येस बँकेचे सीईओ प्रशांत कुमार म्हणाले की एसएमबीसीची गुंतवणूक आमच्या विकासाला नवीन गती देईल. आतापासून एसबीआय आमचा महत्त्वाचा भागीदार राहील.