For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लढाऊ विमानांची विक्री करणार जपान

06:26 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
लढाऊ विमानांची विक्री करणार जपान
Advertisement

ब्रिटन, इटलीच्या सहकार्याने घातक लढाऊ विमानाची निर्मिती

Advertisement

वृत्तसंस्था/ टोकियो

स्वत:च्या शांततावादी आदर्शांना बाजूला करत आता जपान देखील लढाऊ विमानांची विक्री करणार आहे. जपानच्या सरकारने ब्रिटन आणि इटलीसोबत विकसित करण्यात येणाऱ्या नव्या लढाऊ विमानांच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. नव्या नियमांच अंतर्गत जपानने शस्त्रास्त्रनिर्यात सुलभ केली आहे. संरक्षण करार झालेल्या देशांना जपान आता लढाऊ विमानांचा पुरवठा करणार आहे.

Advertisement

जपानने चीन आणि उत्तर कोरियापासून निर्माण झालेले धोके पाहता 2027 पर्यंत संरक्षणखर्च दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक लढाऊ विमानाच्या विक्रीसाठी जपानच्या मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असणार आहे. जपानने नव्या लढाऊ विमानाला विकसित करण्यासाठी ब्रिटन-इटलीच्या उपक्रमात डिसेंबर 2022 मध्ये सहभाग घेतला होता. या कराराला टेम्पेस्ट नाव देण्यात आले असून याच्या अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले लढाऊ विमान विकसित करण्यात येणार आहे.

संरक्षण उपकरणांमध्ये वाढ

ब्रिटन आणि इटलीच्या सहकार्याने विकसित करण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांना 2035 पर्यंत तैनात केले जाणार आहे. जपानने अमेरिकेच्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच अन्य देशासोबत संरक्षण उपकरण विकासावरून करार केला आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा हे एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यारवर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान किशिदा हे अमेरिकेसोबतची संरक्षण भागीदारी वृद्धींगत करण्यावर भर देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शांततावादी आदर्श अन् जपान

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या कब्जातील जपानने स्वीकारलेल्या राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय वादाच्या सोडवणुकीसाठी युद्ध आणि बळाचा वापर न करण्याची तरतूद सामील आहे. तसेच शस्त्रास्त्रनिर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. परंतु 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी ही बंदी शिथिल केली होती. जपानने आता घातक शस्त्रास्त्रांच्या विक्रीसाठीचे नियम आणखी शिथिल केले आहेत.

Advertisement
Tags :

.