For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपान सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

06:18 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
जपान सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ कुमामोटो (जपान)

Advertisement

भारतीय खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या 4 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर्सच्या कुमामोटो मास्टर्स जपान सुपर 500 स्पर्धेत त्यांचा फॉर्म पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करतील, तर उदयोन्मुख खेळाडू दमदार कामगिरी करून दाखविण्याचा प्रयत्न करतील.

हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवून आणि त्यानंतर डेन्मार्क आणि हायलो ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून आपला फॉर्म पुन्हा मिळविणारा लक्ष्य सेन त्या गतीचा फायदा घेण्यास उत्सुक असेल. पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या अल्मोराच्या या 24 वर्षीय खेळाडूला सुऊवातीच्या फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 25 व्या क्रमांकावर असलेल्या कोकी वतानाबेचा सामना करावा लागेल.

Advertisement

2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रणॉयला ऑलिंपिकपूर्व चिकुनगुनियाच्या संसर्गाला तोंड द्यावे लागले होते आणि त्यामुळे पॅरिसच्या तयारीत अडथळे आले होते. तेव्हापासून तो संघर्ष करत आहे. पॅरिसमध्ये तो वेदना सहन करून खेळला, पण लवकर बाहेर पडला. केरळचा हा 33 वर्षीय खेळाडू 2023 मध्ये मलेशिया मास्टर्सचा जेता आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेता ठरला होता. अलीकडच्या काळातील भारताच्या सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेला प्रणॉय दुखापतीतून परतताना आपला फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल.

सप्टेंबरमध्ये कोरिया ओपनमध्ये इंडोनेशियाच्या चिको ऑरा द्वी वार्डोयोविऊद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात प्रणॉयने क्रॉस-कोर्ट स्मॅशनंतर त्याच्या बरगड्यांना पकडत सामन्याच्या मध्यास निवृत्त होणे पसंत केले होते. एका महिन्याहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर तो मलेशियाच्या जुन हाओ लिओंगविऊद्ध सलामीची लढत खेळेल.

उदयोन्मुख खेळाडूंपैकी हायलो ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये सिंगापूरचा माजी विश्वविजेता लोह कीन यूला पराभूत करणारा अमेरिकन ओपन विजेता आयुष शेट्टी पहिल्या फेरीत अव्वल मानांकित थायलंडच्या कुनलावुत विटिडसारनचा सामना करेल. मकाव ओपन सुपर 300 मधील उपांत्य फेरीत पोहोचलेल्या थऊन मन्नेपल्लीचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक जिनशी होईल, तर हायलो ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचताना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हला हरवणारा किरण जॉर्ज पात्रता फेरीतून आलेल्या प्रतिस्पर्ध्याशी लढेल. मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि ऊत्विका शिवानी ग•s यांचा सामना प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाई या अमेरिकन जोडीशी होईल. इतर श्रेणींमध्ये कोणत्याही भारतीयाचा समावेश नाही.

Advertisement
Tags :

.