For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘डॉन 3’मध्ये जान्हवीची वर्णी

06:20 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘डॉन 3’मध्ये जान्हवीची वर्णी

कियारा अडवाणी-रणवीर सिंहसोबत झळकणार

Advertisement

रणवीर सिंहचा चित्रपट ‘डॉन3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटात कियारा अडवाणीनंतर आणखी एका सुंदर अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. फरहान अख्तर या चित्रपटात नव्या चेहऱ्यांसोबत या फ्रेंचाइजीला मोठे स्वरुप देऊ पाहत आहे. शाहरुख खानच्या जागी त्याने रणवीर सिंह तर प्रियांका चोप्राच्या जागी कियारा अडवाणीची निवड केली आहे. आता डॉन 3 या चित्रपटात आणखी एक अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

डॉन या चित्रपटात करिना कपूर दिसून आली होती. चित्रपटात तिने एक आयटम साँग केला होता. आता डॉन 3 या चित्रपटात निर्माते एक आयटम साँग सामील करू इच्छित आहेत. याकरता जान्हवी कपूरशी संपर्क साधण्यात आल्याचे समजते.

Advertisement

अभिनेत्री जान्हवी अलिकडेच याकरता एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. सर्वकाही सुरळीत राहिल्यास करिना कपूरप्रमाणेच जान्हवी स्वत:च्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करू शकते. डॉन 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरच करत आहे. चित्रपटाची निर्मिती देखील त्याच्याच कंपनीकडून करण्यात येत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.