टायगर श्रॉफसोबत दिसणार जान्हवी
पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसून येणार
गूड न्यूज आणि जुग जुग जियो या चित्रपटांच्या यशानंतर निर्माते राज मेहता आणि करण जोहर स्वत:चा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या निर्मात्यांनी स्वत:च्या नव्या पटकथेची निवड करत याकरता कलाकारही निश्चित केले आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूर ही जोडी दिसून येणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘लग जा गले’ असून ही एक अॅक्शन लव्हस्टोरी असणार आहे. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आणि इंटेंस इमोशन्ससह जबरदस्त ड्रामा दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. बागी 4 चित्रपटाचे प्रमोशन पूर्ण झाल्यावर टायगर या चित्रिकरणात सामील होणार आहे. तर राज मेहताकडून दिग्दर्शित लग जा गले हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी कपूर याचबरोबर एका चित्रपटात सध्या व्यग्र असून यात ती वरुण धवनसोबत पुन्हा दिसून येणार आहे. जान्हवी पुढील काही काळात अनेक मोठ्या बिगबजेट चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यामुळे तिच्यासाठी हे वर्ष अत्यंत चांगले ठरणार असल्याचे मानले जात आहे. तर टायगर श्रॉफचे यापूर्वीचे चित्रपट फारसे यशस्वी ठरलेले नाहीत.