‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये जान्हवी
चित्रपटाचे चित्रिकरण सुरू
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. वरुण आणि जान्हवी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येतील. यापूर्वी ‘बवाल’ या चित्रपटात त्यांच्यातील केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट रोमँटिक धाटणीचा असल्याची माहिती जान्हवीने दिली आहे. तर हा चित्रपट पुढील वर्षी 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्स अंतर्गत केली जात आहे. चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत संपणार आहे. जान्हवी अलिकडेच राजकुमार राव याच्यासोबतच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटात दिसून आली आहे. तसेच ती ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्या ‘देवरा’ या चित्रपटातून तेलगूमध्ये पदार्पण करणार आहे. तर वरुण धवन लवकरच ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसून येईल. सिटाडेल या सीरिजमध्ये तो पहिल्यांदा समांथा रुथ प्रभूसोबत झळकणार आहे. तसेच श्रद्धा कपूरसोबत ‘स्त्राr 2’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे.