For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडीत आज कुस्ती मैदान

06:01 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडीत आज कुस्ती मैदान
Advertisement

प्रशांत शिंदे व सुमीत कुमार हरियाणा यांच्या प्रमुख लढत

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

खादरवाडी येथे जय हनुमान तालीम कुस्तीगीर संघटना व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मैदान महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चरणराज हट्टीहोळी, युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या संयोगाने रविवार दि. 2 जून रोजी बन्नीभरमा मंदिर, मंडोळी रोड, खादरवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मेदानाची संपुर्ण तयारी अंमित टप्यात झाली आहे.

Advertisement

सदर मैदानात प्रमुख कुस्ती भोसले व्यायाम शाळेचा प्रशांत शिंदे सांगली व कुमार भारत केसरी सुमीत कुमार हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कामेश पाटील कंग्राळी व कर्नाटक कुमार प्रकाश इंगळगी, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती अमोल नरळे सांगली व किर्तीकुमार बेनके कार्वे, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रेम पाटील कंग्राळी व सचिन नरे निपाणी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती यल्लाप्पा निर्वानहट्टी व मोहन निपाणी, सहाव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज कंग्राळी व विनायक येळ्ळूर, सातव्या क्रमांकाची कुस्ती बाळू शिंदीकुरबेट व बबलू नरळे सांगली, आठव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम तुर्केवाडी व निरंजन येळ्ळूर, नवव्या क्रमांकाची कुस्ती निशांत राशिवडे व भक्ष दर्गा, दहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रवीण निलजी व महादेव दऱ्यानंवर यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

आकर्षक कुस्ती प्रणव खादरवाडी व प्रथमेश येळ्ळूर तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती चेतन येळ्ळूर व निखील कोल्हापूर, गद्याच्या बक्षिसासाठी पिंटू नाईक तुर्केवाडी व करण खादरवाडी, ओमकार खादरवाडी व राहुल माचीगड यांच्यात होणार आहे. तर महिलांसाठी प्रभा खादरवाडी व श्रवणी आंबेवाडी यांच्या होणार असून मेंढ्याच्या बक्षिसासाठी कुस्ती प्रज्वल मच्छे व श्रवण कडोली यांच्यात होणार आहे. या मैदानात महिलांना कुस्तीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

1) कल्याणी वाघवडे व राधिका अनगोळ 2) शीतल खादरवाडी व जान्वी किणये 3) भक्ती गावडे व राणी उचगाव 4) प्रांजल बिर्जे अनगोळ व सुषमा खादरवाडी 5) श्रृती खादरवाडी व श्रावणी गवळी ठळकवाडी 6) सुकन्या संतिबस्तवाड व श्रेया शिवनगेकर 7) श्रेया पाटील खादरवाडी व सुस्मिता संतिबस्तवाड 8) आराध्या येळ्ळूर व समिक्षा खानापूर 9) ऋतुजा वडगाव व तनुजा खानापूर तर स्वरांनी खादरवाडी व राधिका खादरवाडी यांच्या कुस्त्या जोड पाहून होणार आहे. मेदान दुपारी 2.30 वाजता सुरु करण्यात येणार असुन मल्लानी वेळेत उपस्थित राहुन मैदान सुरळीत करण्यास मदत करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.