वडापूर येथे जन सुरक्षा आरोग्य मोहीम संपन्न
अंत्रोळी / समीर शेख :
वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे बँक ऑफ इंडिया, कंदलगाव शाखेच्या वतीने जन सुरक्षा आरोग्य मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री, वित्तीय समावेशन विभाग प्रमुख चेतना गावडे, कंदलगावचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर भिसे, प्रशासकीय अधिकारी अमोगसिद्ध जोडमोटे, तसेच बँकेचे कर्मचारी शिवराम कोळी आणि बसू कोळी उपस्थित होते.

कार्यक्रमात झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री व शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर भिसे यांनी उपस्थित नागरिकांना जन सुरक्षा आरोग्य मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अंत्रोळी व वडापूर येथील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात मोहिमेच्या अंतर्गत दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या प्रसंगी वडापूर व अंत्रोळी गावातील ग्रामस्थांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया, कंदलगाव शाखेचे अधिकारी व कर्मचारी अनिल बगले, सुजाता फुलारी, रमेजराज शेख तसेच वडापूर येथील अरुण पाटील, रुबाब सय्यद, राहुल वाघचौरे, खाजाभाई फुलारी, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पाटील, भानुदास गुंड, रामचंद्र जाधव तसेच प्रभू लिंग मंदिराचे सर्व संचालक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.