For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंटवर बंदी ! गृहमंत्रालयाची मोठी कारवाई

03:58 PM Mar 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंटवर बंदी   गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
Jammu Kashmir National Front

भारतविरोधी प्रचार, अलिप्ततावादी कारावायांना खतपाणी आणि जम्मु काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांचे समर्थन या कारणांमुळे केंद्र सरकारने जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट (JKNF) या संघटनेवर कठोर कारवाई केली. या संघटनेवर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून यासंबंधीची माहीती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या एक्स या सोशलमीडीया अकाउंटवरून देण्यात आले आहे.

Advertisement

यापुर्वी मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेत, गृह मंत्रालयाने (MHA) जम्मु काश्मिर नॅशनल फ्रंट या संघटनेवर आरोप केला होता. नईम अहमद खान यांच्या नेतृत्वाखालील जम्मु काश्मिर नॅशनल फ्रंट संघटना “देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदेशीर कारवाय़ामध्ये गुंतली असल्याचं म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने JKNF च्या सदस्यांवर जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिप्ततावादाला चालना देण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांना लॉजिस्टिक पाठबळ पुरवण्यासाठी दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यात आणि भारतविरोधी प्रचार करण्यात गुंतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात लिहीताना, “मोदी सरकारने आज जम्मू आणि काश्मीर नॅशनल फ्रंटला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले. ही संघटना जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी अलिप्ततावादी कारवाया करत असल्याचे आणि दहशतवादाचे समर्थन करत, राष्ट्राच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला आव्हान देत असल्याचे आढळून आले. भारतातील लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही दहशतवादी शक्तींचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

JKNF चे प्रमुख नईम खान 2017 मध्ये चर्चेत आले होते. 2016 मध्ये काश्मिरी खोऱ्यामध्ये अशांतता पसरवण्साठी पाकिस्तान कडून आलेल्या निधीचा वापर केल्याचे एका टीव्ही चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नईम खान यांनी कबून केले होते. काश्मीर खोऱ्यात निदर्शने करण्यासाठी पाकिस्तानकडून निधी मिळत असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) त्यांची चौकशीही झाली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.