कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीर सरकार सतर्क अन् सज्ज

06:45 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

भारताने पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राइकनंतर उदभवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सध्या घाबरण्याची कुठलीच गरज नसून आवश्यक वस्तूंची कुठलीही टंचाई नाही, रुग्णालयांच्या रक्तपेढींमध्ये पुरवठ्याची कुठलीच समस्या नाही, तसेच महामार्ग वाहतुकीसाठी खुले असल्याचे नमूद केले आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा/एलओसी क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि तयारींचे आकलन करण्यासाठी बैठक घेतली आहे. नागरिक जीवनाची सुरक्षा, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि कुठल्याही आव्हानांना त्वरित उत्तर सुनिश्चित करण्यावर या बैठकीत जोर देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे.

सर्व स्थितींना सामोरे जाण्यास तयार

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशाच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा घेतला आहे. स्थितीवर नजर ठेवून असुन सरकार कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. संवेदनशील क्षेक्षांमधून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविणे आणि त्यांच्यासाठी भोजन, आवास, वैद्यकीय आणि परिवहन सुविधा सुनिश्चित करण्याचा निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. आम्ही प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करू असे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे.

आज मिळाला न्याय

माझ्या मुलासमवेत पहलगाममध्ये 26 लोकांच्या हत्येचा सूड उगविण्यात आल्याने मी आनंदी आहे. मी सरकारचे आभार मानतो. सुरक्षा दल आणि सरकारने सूड घेतला आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा होता, आम्हाला आज न्याय मिळाला असे उद्गार दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या सैयद आदिल हुसैन शाहचे पिता हैदर शाह यांनी काढले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये शाळा बंद

पाकिस्तानवरील स्ट्राइकनंतर जम्मू-काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या. काश्मीरच्या तीन जिल्ह्यांमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या अशी माहिती तेथील आयुक्तांनी दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article