For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमैकाची धावपटू फ्रेझर-प्राइसची 100 मीटर्स शर्यतीतून माघार

06:22 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जमैकाची धावपटू फ्रेझर प्राइसची 100 मीटर्स शर्यतीतून माघार
Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट-डेनिस (फ्रान्स)

Advertisement

जमैकाच्या दोन वेळा ऑलिम्पिक 100 मीटर्स शर्यत जिंकलेल्या शेली-अॅन फ्रेझर-प्राइसची आणखी एका विजेतेपदासाठीची मोहीम शनिवारी अचानक संपुष्टात आली. तिने पॅरिस गेम्समधील 100 मीटर्स शर्यतीच्या उपांत्य फेरीपूर्वी माघार घेतली.

ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिला दुखापत झाली असून या दुखापतीचे स्वरुप उघड करण्यात आलेले नाही. दुसऱ्या उपांत्य फेरीत तिला शाकॅरी रिचर्डसन आणि ज्युलियन आल्फ्रेड यांच्याबरोबर शर्यतीत उतरायचे होते. पण त्याआधीच ‘डीएनएस-डिड नॉट स्टार्ट’ ही अक्षरे स्कोअरबोर्डवर चमकली.

Advertisement

‘आम्हाला फक्त ती दुखापतग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टर्सची एक टीम या प्रकरणी लक्ष देत आहे. आम्ही याविषयी पुढे बोलू’, असे संघ व्यवस्थापक लुडलो वॉट्स यांनी सांगितले आहे. आल्फ्रेडने उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत रिचर्डसनला हरवून सुवर्णपदक पटकावले.

2008 आणि 2012 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या फ्रेझर-प्राइसने हे तिचे पाचवे आणि शेवटचे ऑलिम्पिक असल्याचे म्हटले होते. रविवारी सकाळी सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने तिच्या समर्थकांचे आभार मानले, परंतु तिच्या दुखापतीबद्दल तपशील दिले नाहीत. फ्रेझर-प्राइसने आदल्या दिवशी पहिल्या फेरीत सहज प्रगती केली होती आणि 10.92 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले होते. तिच्याकडे 2021 मध्ये टोकियो गेम्समधील 4×100 मीटर्समधील सुवर्णासह एकूण आठ ऑलिम्पिक पदके, तर जागतिक स्पर्धेतील 16 पदके आहेत.

Advertisement
Tags :

.