For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या जालन्याच्या जोडगोळीला अटक

06:45 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या जालन्याच्या जोडगोळीला अटक
Advertisement

15 लाखांचा ऐवज जप्त, आणखी एक फरार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

जालना जिल्ह्यातील दोघा अट्टल चोरांना अटक करून 15 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बैलहोंगल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

Advertisement

दीपक सुरेश पवार (वय 22), राहुल गंगाधर जाधव (वय 21) दोघेही राहणार करतमंगरुल झोपडपट्टी, पोस्ट कुंभार, पिंपळगाव, ता. गणसांगी, जि. जालना अशी त्यांची नावे आहेत. या जोडगोळीने बैलहोंगल व हुक्केरी तालुक्यात दहाहून अधिक घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पी. व्ही. सालीमठ, नेसरगीचे पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन बिरादार, बैलहोंगलचे पोलीस उपनिरीक्षक गुरुराज कलबुर्गी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांसह अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. वेणूगोपाल व आर. बी. बसर्गी यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.

वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुखांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. शास्त्राrय पद्धतीने दोन तालुक्यात झालेल्या चोरी प्रकरणांचा तपास करून जालना जिल्ह्यातील जोडगोळीला अटक करण्यात आली आहे. दीपक व राहुल हे दोघे जण महाराष्ट्रातून येऊन बेळगाव जिल्ह्यात चोरी करायचे.

या जोडगोळीने बैलहोंगल, नेसरगी, हुक्केरी, संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दहा घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून त्यांच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या टोळीतील आणखी एक आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :

.