कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जयस्वालने मुंबई सोडली; गोवा रणजी संघाचे करणार कप्तानपद

06:58 AM Apr 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

भारताचा कसोटीपटू आणि सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल येत्या रणजी हंगामात (2025-26) गोवा रणजी संघाकडून खेळणार आहे. जयस्वालने मुंबई क्रिकेट संघटनेला सोडचिठ्ठी दिली असून गोव्याला खेळण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ही घेतला आहे. मुंबई सोडण्यासाठी कोणतेही ठोस कारण 23 वर्षीय शैलीदार डावरा फलंदाज यशस्वीने मुंबई क्रिकेट संघटनेला दिलेले नाही. आपणाला येत्या मोसमात गोव्याला खेळायचयं, असा ई-मेलने त्याने एमसीएला पाठविला.

Advertisement

‘होय, यशस्वी जयस्वाल येत्या हंगामात गोवा क्रिकेट संघटनेतर्फे खेळणार आहे. या संबंधी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. ही गोव्याच्या क्रिकेटसाठी चांगली बाब आहे. त्याच्या अनुभवाचा गोव्याच्या क्रिकेटसाठी आणि आमच्या क्रिकेटपटूंसाठी  निश्चितच फायदेशीर होणार असल्याचे गोवा क्रिकेट संघटनेचे मानद सचिव शांबा देसाई म्हणाले. मागील कित्येक दिवस आम्ही यशस्वीच्या संपर्कात होता. आमची चर्चा झाली आणि यशस्वीबाबत आमची मोहिम ‘यशस्वी’ झाली.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला यशस्वी जयस्वाल हा गोव्याचा पुढील हंगामातील कप्तान असेल, असे जीसीएचे मानद सचिव शांबा देसाई म्हणाले.

गेल्या रणजी हंगामात गोव्याच्या रणजी संघात के. व्ही. सिद्धार्थ, रोहन कदम व अर्जुन तेंडुलकर यांचा प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून गोव्याच्या रणजी संघात समावेश होता. मात्र नॉर्थईस्ट राज्यातील कमजोर संघांविरूद्ध सुद्धा हे प्रोफेशनल्स सपशेल अपयशी ठरले होते. यातून के. व्ही. सिद्धार्थ व रोहन कदम या दोन प्रोफेशनल्सचा ‘मोरया’ होणार हे निश्चितच होते. यशस्वी जयस्वाल हा गोव्याचा पुढील हंगामातील कप्तान व प्रोफेशनल क्रिकेटर होणार हे निश्चित झाले. अर्जुन तेंडुलकर हा गोव्याचा दुसरा प्रोफेशनल आहे. गोव्याला आता तिसरा प्रोफेशनल म्हणून आता विकेटकीपर-फलंदाज किंवा एक जलदगती गोलंदाज यांच्यातून एकाची निवड करावी लागेल.

‘आम्ही आणखी एका प्रोफेशनल्सच्या शोधात आहोत. गोवा येत्या हंगामात प्लेट गटातून जेतेपद मिळवून एलिट गटात आला आहे. या विभागात मातब्बर संघ असतात. आम्हाला परत प्लेट गट नकोयं. यासाठी आम्ही आणखी एका दर्जेदार प्रोफेशनल क्रिकेटपटू घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या एका क्रिकेटरसमवेत आम्ही चर्चा केली आहे. चर्चा फलदायीही झाली आहे. लवकरच दुसऱ्या प्रोफेशनल क्रिकेटपटू आम्ही जाहीर करू, असे जीसीएचे सचिव शांबा देसाई म्हणाले.

       ईशान किशनचे नाव प्रोफेशनल म्हणून चर्चेत

गोवा क्रिकेट संघटना बहुदा येत्या मोसमात आपली फलंदाजी आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. जीसीएचे माजी सचिव रोहन गावस देसाई आता भारतीय नियामक मंडळाचे संयुक्त सचिव बनले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंशी त्यांचा चांगला संबंध आहे. जीसीएतून मिळालेल्या माहितीनुसार गोवा क्रिकेट संघटनेने झारखंडचा क्रिकेटपटू आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादला खेळताना राजस्थान रॉयल्सविरूद्ध जबरदस्त शतक ठोकलेला फलंदाज- विकेटकीपर ईशान किशनकडे संपर्क साधला असून त्याला त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते. ईशानच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळलेला एक वेगवान गोलंदाजाचे नावही गोव्याचा तिसरा प्रोफेशनल म्हणून चर्चेत आहे.

 36 रणजी सामन्यांत 12 शतके यशस्वीच्या नावावर

यशस्वी जयस्वालने आतापर्यंत 36 प्रथमक्षेणी सामने खेळले असून 60.85 धावांच्या सरासरीने 3712 धावा केल्या आहेत. 36 सामन्यांतून यशस्वीने 12 शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहेत. 2019 मध्ये यशस्वीने प्रथमक्षेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2021-22 रणजी हंगामात त्याने मुंबईला अंतिम फेरीत नेताना लागोपाठ तीन शतके ठोकली होती. 33 एकदिवशीय लढतीत त्याने 52.62 धावांच्या सरासरीने 1526 धावा केल्या असून टी-20 क्रिकेटमध्ये 149.55च्या स्ट्राईक रेटने 3012 धावा केल्या आहेत.

गेल्या हंगामात यशस्वी जयस्वाल जम्मू काश्मीर विरूद्धच्या रणजी लढतीत खेळला होता व हरलेल्या या सामन्यात त्याने अनुक्रमे 4 व 26 धावा केल्या होत्या. हल्लीच गोव्याला ट्रान्सफर घेतलेला जयस्वाल हा अर्जुन तेंडुलकर व सिद्धेश लाड यांच्यानंतर मुंबईचा तिसरा क्रिकेटपटू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article